Dhananjay Munde : धनंजय मुंडे मुंबईत, भाजपच्या धनाढ्य नेत्याच्या ऑफिसमध्ये

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 18, 2023 | 12:12 IST

Dhananjay Munde in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे सध्या मुंबईत भाजपचे धनाढ्य आमदार अशी ख्याती असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या ऑफिसमध्ये असल्याचे समजते.

Dhananjay Munde in Mumbai
धनंजय मुंडे मुंबईत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • धनंजय मुंडे मुंबईत
  • भाजपच्या धनाढ्य नेत्याच्या ऑफिसमध्ये
  • राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

Dhananjay Munde in Mumbai : 

सुकेशनी नाईकवाडे, बीड 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे सध्या मुंबईत भाजपचे धनाढ्य आमदार अशी ख्याती असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या ऑफिसमध्ये असल्याचे समजते. याआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांचे दोन्ही मोबाइल अनेक तासांसाठी बंद झाले होते. धनंजय मुंडे नॉट रिचेबल झाले होते. लोढांच्या ऑफिसमधील धनंजय मुंडे यांचे फोटो व्हायरल होत आहेत. पण धनंजय मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधलेला नाही. यामुळे धनंजय मुंडे आता नेमके काय करणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार  हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे मुंबईत असल्याचे वृत्त आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. 

मागील काही दिवसांपासून अजित पवार वारंवार नॉट रिचेबल होत आहे. त्यांचे कार्यक्रम रद्द होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ही चर्चा असतानाच धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या आणखी काही आमदारांबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून फुटीच्या शक्यता फेटाळल्या जात आहेत. तसेच सर्व काही आलबेल असल्याचा दावा सुरू आहे. पण राष्ट्रवादीचे प्रमुख नेते वारंवार नॉट रिचेबल होत असल्याचे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.

छान किती दिसती साराच्या या अदा

अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी