यांना मिळणार मुंबईत १६ हजार घरे

मुंबई शहरात पात्र सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे मुंबईत  उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

dhananjay munde sweeper home in mumbai
यांना मिळणार मुंबईत १६ हजार घरे  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई  : मुंबई शहरात पात्र सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे मुंबईत  उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतचा विषयी मुख्यमंत्री महोदयांबरोबर लवकरच बैठक घेण्यात  येईल.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोहा, गोरेगाव व तळा जिल्हा रायगड येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश - धनंजय मुंडे

रायगड जिल्ह्यातील  रोहा, गोरेगाव व तळा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील  रोहा, गोरेगाव व तळा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामासंबंधी आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या जिल्ह्यातील तळा, रोहा व गोरेगाव येथे सामाजिक सभागृहाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु अद्यापही काम सुरु झाले नाही. या संबंधीच्या अडचणी दूर करुन पुढील 15 दिवसात तत्काळ सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात येईल.

यावेळी माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...