राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दोन दिलासादायक निर्णय

दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित असल्यावर चे उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्

Dhananjay Munde two heartbreaking decisions for the disabled in the state
राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी दोन दिलासादायक निर्णय  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • कोरोना टेस्टिंग, उपचार, लसीकरण कुठेही रांगेत थांबावे लागणार नाही
  • दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट
  • राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे दोन महत्वपूर्ण निर्णय आज (दि. 03) घेतले आहेत. 

मुंबई : दिव्यांग व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने कोरोना विषाणूचा अधिक धोका असतो ही बाब लक्षात घेत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे दोन महत्वपूर्ण निर्णय आज (दि. 03) घेतले आहेत. 

दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित असल्यावर चे उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये असे स्पष्ट निर्देश आज शासन निर्णयाद्वारे जारी करण्यात आले आहेत. तसेच या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी आरोग्य विभागाने करावी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

दरम्यान दळणवळणाची अपर्याप्त सुविधा तसेच विविध कार्यालयांमध्ये अगोदरच 15% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची असलेली मुभा लक्षात घेत राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा शासन निर्णय देखील आज सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला असून, संबंधित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापना यांनी उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशित करण्यात आले आहे. 

कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दोनही दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अनेक दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी