धनंजय मुंडेंची 'ती' गोष्ट पुस्तकरुपाने येणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 14, 2021 | 16:23 IST

करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगणारे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याविषयीच्या आणखी रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

dhananjay mundes second wife karuna sharma munde will publish book on untold love story
धनंजय मुंडेंची 'ती' गोष्ट पुस्तकरुपाने येणार 

थोडं पण कामाचं

  • धनंजय मुंडेंची 'ती' गोष्ट पुस्तकरुपाने येणार
  • करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगणारे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला
  • पुस्तकामुळे धनंजय मुंडे यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सार्वजनिक होण्याची शक्यता

मुंबईः महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप झाला होता. उलटसुलट चर्चेला उधाण आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लग्न झाले असले तरी करुणा शर्मा नावाच्या महिलेशी आपले संबंध असल्याची कबुली दिली होती. आता करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगणारे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याविषयीच्या आणखी रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. dhananjay mundes second wife karuna sharma munde will publish book on untold love story

करुणापासून आपल्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. या दोन्ही मुलांना वडील म्हणून माझेच नाव लावण्याची परवानगी दिली आहे. तसेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. लग्न करुन थाटलेला संसार आणि करुणासोबतच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या या दोन्हीसाठी स्वतः खर्च करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. करुणासोबतच्या नात्याची घरातल्यांना पूर्ण कल्पना आहे आणि त्यांची संमती आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. यानंतर तो विषय आपोआप मागे पडला होता. पण करुणा शर्मा मुंडे यांनी पुस्तक लिहिणार असल्याचे जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.

करुणा शर्मा मुंडे त्यांच्या मुलांसह मुंबईत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचा मुद्दा घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी स्वतःची ओळख एक सामाजिक कार्यकर्ती अशी करुन दिली होती. भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असल्याचेही करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या होत्या. यानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगणारे पुस्तक लिहिण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी