धारावी बदलणार रुप; अदानी समूहाची धारावी पुनर्विकासासाठी 5,069 कोटीची बोली

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 30, 2022 | 10:16 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी मुंबईतील (Mumbai) धारावी झोपडपट्टी पुनर्विकास (Dharavi Slum Redevelopment) होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी जगातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

Dharavi transforms; 5,069 crore bid for Adani Group's Dharavi redevelopment
18 वर्षानंतर खुलणार धारवी झोपडपट्टीवासियांचे नशीब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुनर्विकासासाठी ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’ने (डीआरपी) मागविलेल्या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या.
  • प्रकल्पासाठी सहभागी झालेल्या तीन कंपन्यांपैकी अदानी समूहाने 5,069 कोटी रुपयांची बोली लावली.
  • या पुनर्विकासासाठी धारावी झोपडपट्टीला तब्बल 18 वर्ष वाट पाहावी लागली.

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी मुंबईतील (Mumbai) धारावी झोपडपट्टी पुनर्विकास (Dharavi Slum Redevelopment) होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी जगातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. (Dharavi transforms; 5,069 crore bid for Adani Group's Dharavi redevelopment)

अधिक वाचा  : रिझर्व्ह बॅंकेच्या डिजिटल रुपीची सुरूवात 1 डिसेंबरपासून

पुनर्विकासासाठी ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’ने (डीआरपी) मागविलेल्या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. प्रकल्पासाठी सहभागी झालेल्या तीन कंपन्यांपैकी अदानी समूहाने 5,069 कोटी रुपयांची बोली लावली. ही बोली सर्वाधिक असून अदानी समूह या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार आहे. या पुनर्विकासासाठी धारावी झोपडपट्टीला तब्बल 18 वर्ष वाट पाहावी लागली.  

अधिक वाचा  : दिशाबद्दल प्रश्न विचारताच राणेंनी पत्रकार परिषद आवरली

धारावी पुनर्विकासासाठी यापूर्वी अनेकवेळा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला होता. परिणामी धारावीतील रहिवाशांमध्येही नाराजी होती. हा प्रकल्प 18 वर्षे रखडल्याने धारावीचा पुनर्विकास कधी होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. या वर्षांमध्ये राज्य सरकारने या झोपडपट्टीमध्ये अनेक विविध योजना आणल्या परंतु त्या अंमलात आल्या नाहीत तर अनेकांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही.  त्यातच, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या 45 एकर जागेचाही तिढा निर्माण झाला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून हा अडथळा दूर केला. त्यानंतर धारावी पुनर्विकासासाठी पीएमसी आणि प्रत्यक्ष पुनर्विकासामध्ये रस असलेल्या कंपन्यांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा  : रेल्वे कर्मचार्‍याची ही हातचलाखी पाहिली का ?

दरम्यान,प्रकल्पाची जबाबदारी जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवली आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे धारावीतील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना लाभ मिळणार आहे. हा प्रकल्प 20,0000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे. सरकारने 2019 मध्येही धारावी विकासासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती, पण नंतर विविध कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली होती.  पुनर्विकासाचा प्रकल्प आपल्या हाती घेण्यासाठी मैदानात तीन कंपन्या उतरल्या होत्या.

 खरंतर या प्रकल्पासाठी चौथ्यांदा जागतिक स्तरावर निविदा मागवल्या. या निविदेला आठ कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ तीन कंपन्यांनीच आपल्या निविदा सादर केल्या होत्या. यातील दुसऱ्या क्रमांकावर डीएलएफची बोली होती, त्यांनी 2, 025 कोटींची बोली लावली. तर तिसऱ्या क्रमांकावरील श्री नमन कंपनीची बोली अपात्र ठरली.

या बोलींमध्ये अदानी समूहाची बोली सर्वाधिक होती, त्यामुळे हा प्रकल्प अदानींकडे गेला आहे. परंतु राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अदानींच्या निविदेला अंतिम रूप येईल आणि धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.  दरम्यान या धारावी पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसन, पुनर्विकास यांची सांगड साधली जाणार असल्याचे डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी