Dhirendra Shastri Statement: बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त वक्तव्यानं राजकारण पेटलं.. शिंदे-फडणवीस सरकारचं मौन का?

मुंबई
Updated Apr 04, 2023 | 11:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhirendra Shastri Controversial Statement: अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा (Shirdi Sai baba)यांच्याविषयी बागेश्वरधामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री  (Dhirendra Krishna Shastri) यांनी वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) केलं आहे. साईबाबा (Sai Baba) हे देव नसून ते संत किंवा फकीर होते, असं बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्रात राजकारण (Maharashtra Politics) पेटलं असताना शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) मौन का

Dhirendra Shastri Controversial Statement
साईबाबा देव नाहीत, फकीर ! बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त वक्तव्यानं राजकारण पेटलं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
  • महाराष्ट्रात राजकारण तापलं...
  • आधी संत परंपरा समजून घ्या...

Dhirendra Shastri Controversial Statement: बागेश्वरधामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) चर्चेत आले आहेत. सोशल मीडिया (Social Media) धीरेंद्र शास्त्री यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. साईबाबा (Sai Baba) हे संत होते, फकीर होते पण ते देव, परमेश्वर नव्हते, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उडली आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या त्या वक्तव्याचा देशभरातील साईभक्तांकडून निषेध केला जात आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागावी, अशी मागणी होत असताना मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिंदे-फडणवीस सरकारनं याबाबत कमालीचं मौन पाळलं आहे. तसेचं उद्धव ठाकरे यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

धीरेंद्र शास्त्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  मध्यप्रदेशातील जबलपूर येथील हा व्हिडीओ असल्याचे समजते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, माझ्या वक्तव्याने वाद सुरू होतो. परंतु हे सांगणं गरजेचं आहे. साईबाबा एक संत होते. ते फकीर होते. परंतु ते देव नव्हते. कातडे पांघरलं म्हणून कोणीही सिंह बनू शकत नाही. तसंच शंकराचार्यांसारखा गेटअप केल्यानंतर कोणी शंकराचार्य बनू शकत नाही. संत हे संत आणि देव म्हणजेच देव, असं देखील धीरेंद्र शास्त्री यांनी यावेळी सांगितलं. 

संत परंपरा आधी समजून घ्या...

साईबाबा यांनी ते हयात असताना वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे शिर्डीतील साईसंस्थानकडून वैदिक परंपरा आजही जपल्या जात आहेत. साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी महराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी, साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुरोहीत बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे. 

महाराष्ट्रात राजकारण तापलं...

बागेश्वरधामचे पीठाधिश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांबाबत काय अशी वादग्रस्त वक्तव्ये करत आली आहेत, असं साईभक्तांनी म्हटलं आहे. साईभक्तांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना राजकिय नेत्याकडून देखील तिखट प्रतिक्रिया उमटत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यासाठी सर्वांना आमंत्रण दिले जात आहे. बागेश्वरबाबाला ज्यांनी इथे बोलावलं होतं त्यांनी आता साईबाबांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन देखील आव्हाड यांनी दिलं आहे. 

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. साईबाबांवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. ते साईबाबांना मानत नाही, तर त्यांची पूजा करतात. धीरेंद्र शास्त्री साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली आहे.  

दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी याआधी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सनातन धर्माबाबत वक्तव्य करून केंद्रीय मंत्र्यांन  आशीर्वाद देणे, विचित्र वर्तवणूक, बेकायदा जमिनीवर दावा केल्याचा आरोप देखील धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी