Mumbai pre-school : मुंबईच्या प्री स्कूलमध्ये धक्कादायक घटना, शिक्षिकेच्या चुकीमुळे चिमुरडीने 2 बोटे गमावली

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 16, 2023 | 09:35 IST

Dindoshi Police filed an FIR against pre-school teacher after 2-yr-old suffers injuries : मुंबईच्या प्री स्कूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शिक्षिकेच्या चुकीमुळे चिमुरडीने 2 बोटे गमावली.

Dindoshi Police filed an FIR against pre-school teacher
मुंबईच्या प्री स्कूलमध्ये धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या प्री स्कूलमध्ये धक्कादायक घटना
  • शिक्षिकेच्या चुकीमुळे चिमुरडीने 2 बोटे गमावली
  • मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

Dindoshi Police filed an FIR against pre-school teacher after 2-yr-old suffers injuries : मुंबईच्या प्री स्कूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शिक्षिकेच्या चुकीमुळे चिमुरडीने 2 बोटे गमावली. या प्रकरणात मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आली आहे. एफआयआरमध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून प्री स्कूलच्या प्रिन्सिपलचा (मुख्याध्यापिका) तसेच संबंधित टीचरच्या (शिक्षिका) नावाचा उल्लेख केला आहे. 

Relief Fund Scam in KEM : खोट्या सह्या करून लुबाडला गरीब रुग्णांचा मदतनिधी, KEMच्या महिला कर्मचाऱ्याविरोधात FIR

Iqbal Singh Chahal: 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी इक्बालसिंह चहल यांना ईडीची नोटीस

चिमुरडीला गुरुवार 5 जानेवारी 2023 रोजी तिच्या वडिलांनी प्री स्कूलमध्ये सोडले. यानंतर काही तासांतच प्री स्कूल प्रशासनाने चिमुरडीच्या आईला फोन केला. फोन करून तातडीने शाळेत या असे सांगण्यात आले. चिमुरडीचे पालक लगेच प्री स्कूलमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या मुलीला जखमी झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच पालक हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये मुलीच्या हाताच्या बोटांवर ऑपरेशन करण्यात आले नंतर ड्रेसिंग करण्यात आले. हा प्रकार बघून मुलीच्या पालकांनी चौकशी केली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना, मुलगी शाळेच्या दाराजवळ खेळत होती आणि त्यावेळी नकळत बोट चिमटून दुखापत झाली; अशी माहिती प्री स्कूल प्रशासनाने दिली. हे उत्तर ऐकून पालकांना संशय आला. अखेर त्यांनी प्री स्कूलचे सीसीटीव्ही फूटेज बघण्याचा आग्रह धरला. या फूटेजमध्ये टीचरने दार बंद केलं त्यावेळी मुलीच्या हाताची 2 बोटं चिमटल्याचे स्पष्ट दिसले. धक्कादायक म्हणजे मुलगी रडत असूनही संबंधित टीचरने बराचवेळ दुर्लक्ष केले होते. यामुळे गंभीर दुखापत झाली आणि चिमुरडीने हाताची 2 बोटे गमावली. या प्रकरणात चिमुरडीच्या पालकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविली आहे. पालकांनी दिलेल्या माहितीआधारे नोंदविण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका प्री स्कूलच्या संबंधित टीचरवर ठेवण्यात आला आहे. प्रिन्सिपल या पदावरील व्यक्ती शाळेतील सर्व चांगल्या वाईट घटनांसाठी तांत्रिकदृष्ट्या जबाबदार धरली जाते. याच कारणामुळे प्रिन्सिपलच्या नावाचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी