राष्ट्रपती निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सॉलीड कनेक्शन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 22, 2022 | 14:41 IST

Direct link between presidential election and political developments in Maharashtra : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला असताना महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे.

Direct link between presidential election and political developments in Maharashtra
राष्ट्रपती निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सॉलीड कनेक्शन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रपती निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सॉलीड कनेक्शन
  • महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे
  • राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी

Direct link between presidential election and political developments in Maharashtra : मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला असताना महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी यांचा थेट संबंध असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. भारताच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होईल आणि मतमोजणी २१ जुलै २०२२ रोजी होईल. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना काढली आहे. 

भारताच्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी सध्या जो नियम वापरला त्यानुसार लोकसभेचे ५४३ पैकी ५४० जण (३ जागा रिक्त आहेत) आणि राज्यसभेचे २३३ पैकी २१७ (१६ जागा रिक्त आहेत) जण मतदान करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. भारतातील सर्व विधानसभांचे मिळून ४१२० आमदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात सत्ता असल्यास अपक्ष आमदार आणि भाजपचे समर्थक नसलेल्या छोट्या पक्षांचे आमदार यांच्याशी चर्चा करून एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जास्तीत जास्त समर्थन मिळवणे भाजपला सोपे होणार आहे. 

ज्या राज्यांच्या खासदार आणि आमदारांच्या मतांचे मूल्य मोठे आहे अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. यामुळेच भाजपचा प्रयत्न राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी राज्यातील सत्ता समीकरण भाजपच्या सोयीचे करून घेण्याकडे आहे, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना संकट आले. यामुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या. विधीमंडळाशी संबंधित अपरिहार्य असलेल्या निवडणुका टाळून उमेदवार बिनविरोध निवडण्यावर महाविकास आघाडी सरकारने भर दिला. पण राज्यसभेच्या सहा आणि विधानपरिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकांवेळी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडणे मविआला जमले नाही. या निमित्ताने भाजपने त्यांच्या अधिकृत संख्याबळापेक्षा जास्त मते मिळवली. भाजपने दोन्ही निवडणुकांमध्ये उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाले. यानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे. घटनांचा वेग बघता राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी सत्ता समीकरणाचे नवे चित्र स्पष्ट होईल, असे अभ्यासक सांगत आहेत.

सध्या भाजपकडे विधानसभेवर निवडून आलेले १०६ आमदार आहेत. त्यांना इतरही काही आमदारांचा पाठिंबा आहे. पण शिवसेनेत बंड करणाऱ्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला तर महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त पाठिंबा मिळवणे भाजपसाठी सोपे होणार आहे. यामुळेच राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी यांचा थेट संबंध असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी