Discussion on the banner displayed in Shivaji Park Dadar Mumbai : साहेब मला माफ करा... मी क्षमस्व आहे... अशा स्वरुपाचा बॅनर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ लावण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून राजेश चिंदरकर नावाच्या शिवसैनिकाने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
'साहेब आपल्या आशीर्वादाने मी राजकारणामध्ये आलो आणि आपल्या आठवणीचा व ज्ञानाचा अमृत साठा घेऊन एक शिवसैनिक म्हणून माझी राजकीय वाटचाल यशस्वीरित्या चालू ठेवली आहे. आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे शिलालेख, तसेच आपल्याला आवडणाऱ्या चाफ्यांच्या फुलांचे उद्यान निर्माण करण्यासाठी मी २०१३पासून मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करत होतो. शेवटी सन २०१९मध्ये माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मला उद्यानाची परवानगी मिळाली. परंतु जेव्हा हे काम साकारण्याचा माझ्या संस्थेने प्रयत्न केला, तेव्हा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कदाचित माझे हे काम आवडले नसावे. त्यांनी काम सुरू होण्यापूर्वीच माझ्याकडे टक्केवारीची मागणी केली. मात्र हे काम अधिकृत असल्यामुळे त्यांना मी टक्केवारी देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी हे काम सुरू होण्याआधीच थांबवले'; अशा स्वरुपाचे आरोप बॅनरद्वारे करण्यात आले आहेत.
Makar Sankranti : यंदा कधी आहे भोगी, मकरसंक्रांती आणि किंक्रांत?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याची फुले आवडत होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात भारतीय कामगार सेनेकडून चाफ्यांच्या फुलांचा हार उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जातो. हा हार मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या खोलीत नेऊन ठेवावा, ही अपेक्षा त्यामागे असते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.