Narayan Rane : दिशाबद्दल प्रश्न विचारताच राणेंनी पत्रकार परिषद आवरली

Narayan Rane : आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच दिशा सालियनवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला याचा पुनरुच्चारही राणे यांनी केला. सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांचा खून झाला होता असा दावा पुन्हा राणे यांनी केला आहे.

थोडं पण कामाचं
  • आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
  • तसेच दिशा सालियनवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला याचा पुनरुच्चारही राणे यांनी केला.
  • सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांचा खून झाला होता असा दावा पुन्हा राणे यांनी केला आहे.

Narayan Rane : मुंबई : आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच दिशा सालियनवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला याचा पुनरुच्चारही राणे यांनी केला. सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांचा खून झाला होता असा दावा पुन्हा राणे यांनी केला आहे. (disha salian was raped and murdered say bjp leader narayan rane)

काही दिवसांपूर्वी सीबीआयने दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाला असे स्पष्ट केले होते. परंतु केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सीबीआयमध्ये ही केस सुरूच असल्याचे सांगितले. दिशा सालियनवर अत्याचार झाले आणि तिचा खून करण्यात आला होता असे राणे म्हणाले. तसेच दिशाचा शवविच्छेदन अहवाल आपल्याकडे आहे. दिशाच्या खूनाबद्दल  आपण सर्व पुरावे सादर केल्याचेही राणे यांनी सांगितले. परंतु पत्रकार दिशावर आणखी काही विचारणार तेवढ्यात नारायण राणे यांनी पत्रकार परिषद संपवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी