दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, CBI ने केले स्पष्ट, राणे पितापुत्रांचे आरोप ठरले बिनबुडाचे

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 23, 2022 | 13:56 IST

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला होता. परंतु दिशाचा मृत्यू हा दारूच्या नशेतच तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाला, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआय तपास संस्थेने दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

Disha Salian's death was accidental, CBI clarified
दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच,CBI ने केले स्पष्ट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिशा सालियनचा मृत्यू नशेत असताना 14 व्या मजल्यावरून तोल गेल्याने छतावरून पडून झाला.
  • सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला होता.
  • दिशाच्या मृत्यू प्रकरणात कोणाताही राजकीय अँगल नाहीये.

मुंबई  : अभिनेता (Actor)  सुशांत सिंग राजपुत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर (manager) दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणी सीबीआयने (CBI) मोठा खुलासा केला आहे. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दिशा सालियनचा मृत्यू नशेत असताना 14 व्या मजल्यावरून तोल गेल्याने छतावरून पडून झाल्याचा सीबीआयने निष्कर्ष काढला आहे. याबद्दल अहवाल सादर केला आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं स्पष्ट केलं आहे. सीबीआयच्या या निकालामुळे राणे पितापुत्रांची नाचक्की झाली आहे. राणे पिता पुत्रांनी आरोप करत आदित्य ठाकरेंना या अडकविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे आरोप बिनबुडाचे ठरवत सीबीआयने राणेंना खोटारडे ठरवले आहे. (Disha Salian's death was accidental, CBI clarified)

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला होता. परंतु दिशाचा मृत्यू हा दारूच्या नशेतच तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाला, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआय तपास संस्थेने दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

द इकोनॉमिक टाइम्सने छापलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत हे काही काळ काम केले होते, त्यामुळे दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे तिच्या मृत्यूची चौकशी करणयात आली आहे.  या चौकशीदरम्यान दिशाच्या मृत्यू प्रकरणात कोणाताही राजकीय अँगल नाहीये. दारूच्या नशेत असताना छतावर असताना तिचा तोल जाऊन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले आहे.  साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे. 

विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोप केला होता. एवढेच नाहीतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावाही केला होता. मात्र सीबीआयच्या या निष्कर्षानंतर राणे पितापुत्रांकडून होणारे आरोप आता बंद होतील, अशी आशा आहे.  दरम्यान, दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते तसेच राणेंकडूनही हे प्रश्न केली गेली होती. त्या रात्री पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न मांडले गेले.

ज्या रात्री दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री एका पक्षाचे एक मोठे मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांचा बचाव करण्यासाठी दिशाच्या हत्येला आत्महत्या असे संबोधले जात होते. पण व्हिडिओत हे देखील स्पष्टपणे दिसून आले आहे की त्या रात्री दिशा आणि तिच्या मित्रांशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की दिशावर बलात्कार झाला नव्हता व दिशा गर्भवतीही नव्हती. 

आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार

नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हाला जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेली आहे. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल दिशाच्या आई-वडिलांनी राणेंना केला होता.

'जे दावे केले जात आहेत तसं काहीही झालेलं नाहीये माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जात आहे. सर्व सत्य पोलिसांना माहिती आहे. बदनामी होत राहिली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जीवाचं बरंवाईट केलं तर त्यासाठी नेते जबाबदार असतील, असं म्हणत त्यांनी आम्हाला बदनाम करू नका सांगितले होतं. 

काय आहे प्रकरण?

28 वर्षाच्या दिशा सालियानने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी