Dismiss the cabinet of Maharashtra, BJP's letter to governor : मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने फक्त आमदार प्रताप सरनाईक यांचा फायदा व्हावा यासाठी एका बेकायदा कृत्याला वैधता मिळवून दिली आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळाने पदग्रहण करताना घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. ही शपथ राज्यपालांनी दिली होती. यामुळे शपथभंग केल्याप्रकरणी राज्यपालांनी महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे अशी मागणी करणारे लेखी निवेदन महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.
Mumbai Fire : मुंबईत २० मजली इमारतीला आग ७ ठार
मंत्रिपद स्वीकारताना कोणत्याही एका व्यक्तीच्या फायद्यासाठी पक्षपाती निर्णय घेणार नाही अशा स्वरुपाची शपथ घेतली जाते. पण मंत्रिमंडळाने या शपथेचा भंग केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक इमारत बांधली आहे. महापालिकेने ९ मजली इमारतीला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात १३ मजल्यांची इमारत बांधण्यात आली. या प्रकरणी महापालिकेच्या प्रशासनाने चार अनधिकृत मजल्यांसाठी चौकशीअंती दंड लागू केला. सरकारी प्रक्रियेत जो कालावधी गेला त्याचा विचार करुन दंडावर व्याज आकारून दंडाची एकूण रक्कम निश्चित करण्यात आली. पण मंत्रिमंडळाने संपूर्ण दंड माफ केला. हा निर्णय फक्त एका व्यक्तीच्या भल्यासाठी घेण्यात आला. मंत्रिमंडळाचा हा निर्णय म्हणजे शपथेचा भंग आहे यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त करा; अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.
मंत्रिमंडळाच्या कृतीची चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन राज्याच्या लोकायुक्तांना द्यायचे आहे. पण नव्या लोकायुक्तांनी पदभार स्वीकारलेला नाही आणि उप लोकायुक्त आज कार्यालयात नाहीत. यामुळे उपलोकायुक्तांकडे सोमवारी निवेदन देणार; असे चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या शिष्टमंडळाने सांगितले.
राज्यपाल मंत्र्यांना शपथ देताता आणि मंत्री शपथ घेऊन पदभार स्वीकारतात. पण सरनाईकांना फायदा मिळवून देताना संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे यामुळे हे मंत्रिमंडळ बरखास्त करावे; अशी मागणी राज्यपालांना केल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी होईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा या राज्यांमध्ये भाजप सत्ता राखेल. पंजाबमध्येही भाजप उत्तम कामगिरी करेल; असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. गोव्यात काही जण नाराज आहेत बंडखोरी करत आहेत अशी वृत्त येत आहेत. पण गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत; असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.