'कोरोनाशी सामना करायचाय असेल तर  AC वापरु  नका'

मुंबई
रोहित गोळे
Updated Mar 25, 2020 | 23:07 IST

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती घटनांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना एसी म्हणजेच एअर कंडिशनर न वापरण्यास सांगितले आहे.

do not use ac to deal with corona maharashtra cm uddhav thackeray appeals
'कोरोनाशी सामना करायचाय असेल तर  AC वापरु  नका'  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्य सरकारवरील ताण बराच वाढला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर उपाययोजना करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन  करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  बुधवारी सकाळी राज्यात कोरोनाचे ५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ११२ वर पोहचली आहे, हे लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरूद्ध ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना एसी म्हणजेच एअर कंडिशनर (एसी) न वापरण्यास सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एक उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी एसी वापरु नये. कारण एसी हे  तापमान थंड करतं व आर्द्रता वाढवत. त्यामुळे एसीची वापर टाळावा. 

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहतील. अत्यावश्यक कामे बंद होणार नाहीत, वस्तूंचा साठा करण्यासाठी उगाचच घराबाहेर पडू नका, आपण बाहेर सामान घ्यायला गेलात तरी एकटेच जा.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या आपत्तीची आधीच युद्धाशी तुलना केली आहे. त्यामुळे धोका पत्करु नका कारण हा एक अदृश्य शत्रू आहे आणि त्यामुळेच तो जास्त धोकादायक आहे.'

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देशांतर्गत उड्डाणे थांबविण्याच्या सूचना मान्य केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आयकर आणि जीएसटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्चची मुदत पुढे ढकलल्याचेही ठाकरे यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सहकार्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आणि ते म्हणाले, '(कोरोना व्हायरस) स्क्रीनिग सुविधांची संख्या वाढविण्याची आमची मागणी केंद्राने मान्य केली आहे.'
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी