एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 06, 2022 | 16:40 IST

do you know Raj Thackeray's Grandson name and it's meaning : अमित आणि मितालीच्या मुलाचं बारसं झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियासाठी खास फोटो काढून घेतले. या फोटोंमध्ये ठाकरे कुटुंबातील पाच पिढ्या एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसत आहेत.

do you know Raj Thackeray's Grandson name and it's meaning
एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या
  • फोटोफ्रेममध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे तर फोटोफ्रेमच्यापुढे राज ठाकरे, अमित ठाकरे आणि किआन
  • किआन या नावाचा अर्थ देवाची कृपा

do you know Raj Thackeray's Grandson name and it's meaning : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव ठरले. राज ठाकरे यांचे पुत्र अमित आणि सून मिताली बोरुडे या दाम्पत्याला मुलगा झाला. या मुलाचे नाव किआन असे ठेवण्यात आले. किआनमुळे राज ठाकरे आजोबा आणि राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे आजीच्या भूमिकेत दाखल झाली आहे. अमित आणि मितालीच्या मुलाचं बारसं झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियासाठी खास फोटो काढून घेतले. या फोटोंमध्ये ठाकरे कुटुंबातील पाच पिढ्या एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसत आहेत. फोटोफ्रेममध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे तर फोटोफ्रेमच्यापुढे राज ठाकरे, अमित ठाकरे आणि किआन ठाकरे दिसत आहेत.  

किआन या नावाचा अर्थ देवाची कृपा असा आहे. राज यांच्या नातवाची रास मिथुन आणि नक्षत्र मृग आहे. अमित-मिताली या दाम्पत्याला मुलगा झाला त्याच्या काही दिवस आधीच राज ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब कृष्णकुंज मधून शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी वास्तव्यास आले. या नव्या घरातच किआन हसणार खिदळणार आणि बागडणार आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे लग्न २७ जानेवारी २०१९ मध्ये झाले. या दाम्पत्याला मुलगा झाला त्यावेळी राज यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नातवाला बघितले होते. यानंतर राज यांच्या नातवाचे नाव काय असेल या मुद्यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. अखेर राज यांच्या नातवाचे नाव जाहीर झाल्यामुळे ही चर्चा संपुष्टात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी