[VIDEO] डॉक्टर २४ तास लढतायेत, आपण घरातून अजिबात बाहेर पडू नका: मुख्यमंत्री

मुंबई
रोहित गोळे
Updated Mar 19, 2020 | 14:08 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी यंत्रणा बरेच प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

doctors fight for 24 hours you should never leave home said cm uddhav thackeray 
[VIDEO] डॉक्टर २४ तास लढतायेत, आपण घरातून अजिबात बाहेर पडून नका: मुख्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी साधला संवाद
 • राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
 • रेल्वे, बसची गर्दी पूर्णपणे कमी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आशा

मुंबई: कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होत आहे. गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सध्या तरी आपण फेज २ मध्ये आहोत. मात्र, जर आपण फेज ३ मध्ये पोहचले तर मात्र, ही परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला लाइव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.

काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोवा व्हायरस विरोधात युद्ध सुरु आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावं. घराबाहेर अजिबात पडून नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

पाहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 


 

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना मांडले महत्त्वाचे मुद्दे:

 1. घरातून अजिबात बाहेर पडून नका, अनावश्यक प्रवास टाळा  
 2. नवे रुग्ण वेगाने वाढत नाहीत ही समधानाची गोष्ट 
 3. हे परदेशी संकट आहे 
 4. नक्कीच काळजीची परिस्थिती आहे. 
 5. आपण सुरक्षित राहा, घरही सुरक्षित ठेवा 
 6. पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं. ते स्वत: देखील आपल्या बरोबर आहेत. 
 7. केंद्र सरकार आपल्याबरोबर आहे. सर्व ती मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
 8. स्टॅम्प मारलेल्या लोकांनी घरातून बाहेर पडू नये. 
 9. सरकारने सांगितलेल्या सूचना पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका. 
 10. मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढत आहे 
 11. ट्रेन आणि बसमधील गर्दी कमी झाली आहे. पण ही गर्दी पूर्णपणे कमी झाली पाहिजे. 
 12. ट्रेन, बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. सरकार अशा निर्णय घेऊ शकतं पण तशी माझी इच्छा नाही.  
 13. या संकटाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची गरज आहे. 
 14. या युद्धाचा मुकाबला करताना आपली यंत्रणा सज्ज आहे. 
 15. एक यंत्रणा काम करत असताना आपण २४ तास घरात राहू शकत नाही का? 
 16. धार्मिक यात्रा, जत्रा, क्रीडा यासारख्या गोष्टी रद्द करण्यात आल्या आहेत.  
 17. डॉक्टर मंडळी आपल्यासाठी २४ तास लढत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी