शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज एकदिवसीय कामबंद आंदोलन, बेमुदत आंदोलनाचा इशारा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या आणि त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी आज या महाविद्यालयातील डॉक्टर एकदिवसीय कामबंद आंदोलन करत आहेत.

Doctors
शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज एकदिवसीय कामबंद आंदोलन, बेमुदत आंदोलनाचा इशारा  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • मागील दोन वर्षांपासून मागण्यांसाठी आंदोलन
  • कोरोनाच्या काळात दिवसरात्र सेवा देऊनही मागण्या दुर्लक्षित
  • डॉक्टरांनी सरकारला दिला 24 तासांचा वेळ

मुंबई: कोरोनाच्या संकटाच्या (Corona pandemic) सुरुवातीपासूनच हा संसर्ग (infection) रोखण्यात आणि संसर्गबाधितांचे प्राण वाचवण्यात (saving lives) विविध रुग्णालये (hospitals) आणि इतर आस्थापनांमधील (establishments) डॉक्टरांची (doctors) भूमिका (role) ही अतिशय महत्वाची (important) राहिलेली आहे. मात्र आज महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व शासकीय (governmental), वैद्यकीय महाविद्यालयांमधील (medical colleges) आणि रुग्णालयांमधील डॉक्टर आज एकदिवसीय कामबंद आंदोलन (no work agitation) करत आहेत. सरकारने त्यांच्या मागण्या (demands) मान्य न केल्यास येत्या 22 तारखेपासून बेमुदत आंदोलन (indefinite strike) करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मागील दोन वर्षांपासून मागण्यांसाठी आंदोलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी केले जावे आणि त्यांचा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जावे या मागण्यांसाठी हे डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मागणी करत आहेत. सरकारने दरवेळी त्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी यंदा मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या काळात दिवसरात्र सेवा देऊनही मागण्या दुर्लक्षित

आंदोलनकर्त्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या संकटाच्या काळात एकही दिवस सुट्टी न घेता विलगीकरणासाठीही सुट्टी न घेता दिवसरात्र या डॉक्टरांनी काम केले. तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मागण्या मान्य केल्याने सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार येईल असेही चित्र उभे केले जात आहे, मात्र असे काहीही होणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे.

डॉक्टरांनी सरकारला दिला 24 तासांचा वेळ

अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी जागा देण्याच्या आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांसाठी एका दिवसाचं कामबंद आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांनी सरकारला 24 तासांचा इशारा दिला आहे. जर प्रशासनाने अजूनही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 22 एप्रिलपासून हे आंदोलन बेमुदत करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी