मुंबई : डॉक्टरांनी (doctor) लिहून दिलेल्या औषधांची (medicine) नावे आपल्याला सहसा वाचता येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे डॉक्टरांची लिहिण्याची स्टाईल आणि दुसरं म्हणजे जे औषध लिहून दिलं आहे, ते इंग्रजी (English) भाषेत (language) असतं. परंतु समजा डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध हे मराठीतून असेल तर. आहे भारी गोष्ट, नुसतं भारीच नाहीतर हे घडणार देखील आहे. कारण महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय शिक्षण मराठीतून सुरू करण्याची घोषणा केली आहे. (Doctors will now prescribe medicines in Marathi; MBBS, BDS will be taught in Marathi language)
अधिक वाचा : अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून साजिदविरोधात छळाची तक्रार
देशातील दोन राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू झाल्यानंतर आता एमबीबीएसचं शिक्षण मराठीतून होणार आहे. याविषयी महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी भाषा जाणत नाहीत, त्या विद्यार्थ्यांची या पदवीसाठी प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढेल. तसेच पुढील वर्षापासून मराठीतून Medical Educationवैद्यकीय शिक्षण सुरू करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.
अधिक वाचा : हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू; 82 जखमी
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने याआधीच एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून शिकवले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मंत्री महाजन म्हणाले की महाराष्ट्र एक पाऊल पुढे गेला आहे. केवळ एमबीबीएसच नाही, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी, दंतचिकित्सा आणि नर्सिंग या वैद्यकीय प्रॅक्टिसचे इतर विषयही मराठीतून शिकवले जातील, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, महाजन म्हणाले की, सरकारने योजना आणि त्याबाबतची पावले अभ्यासण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिक्षण घेतले आहे, त्यातील काहींना इंग्रजी भाषा समजण्यात अडचण येते, अशा विद्यार्थ्यांना मराठी अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय पदवी घेण्यास मदत होईल. गेल्या महिन्यातच राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयावर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्व अभ्यासक्रम बदलण्यासाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील लोक दोन गटात विभागले गेले आहेत. रुग्णांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. रुग्णांनी नोंदवलेली लक्षणे स्थानिक भाषेत डॉक्टर चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील.तसेच इतरांचा असा विश्वास आहे की, मराठीतील वैद्यकीय अभ्यास डॉक्टरांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित करेल. वैद्यकशास्त्रासारखा वैज्ञानिक विषय जागतिक संशोधन आणि मानकांनुसार ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांचे मत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.