जन्मदिनी भेटायला येऊ नका, आहे तेथूनच शुभेच्छा द्या; राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना संदेश

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 13, 2022 | 00:20 IST

माझा वाढदिवस 14 जूनला आहे पण माझ्या वाढदिवशी भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली. कोरोनाच्या मृत पेशी सापडल्यामुळे माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली होती, आता पुन्हा तुम्ही भेटायचला आल्यास कोरोनाची लागण झाली तर शस्त्रक्रिया आणखी पुढे ढकलेल आणि हा धोका मी पत्करु शकणार नाही, शस्त्रक्रिया होऊन बरे वाटल्यानंतर मी सर्वांशी भेटेल असे ट्विटच मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी आज केले.

Don't come to meet me on my birthday, wish me from there - Raj Thackeray
जन्मदिनी भेटायला येऊ नका, आहे तेथूनच शुभेच्छा द्या-राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे 14 जून रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
  • दरवर्षी त्यांना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात.
  • दहा दिवसांपासून कोविडच्या नियमांनुसार घरातच क्वॉरंटाईन

मुंबई :  माझा वाढदिवस 14 जूनला आहे पण माझ्या वाढदिवशी भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली. कोरोनाच्या मृत पेशी सापडल्यामुळे माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली होती, आता पुन्हा तुम्ही भेटायचला आल्यास कोरोनाची लागण झाली तर शस्त्रक्रिया आणखी पुढे ढकलेल आणि हा धोका मी पत्करु शकणार नाही, शस्त्रक्रिया होऊन बरे वाटल्यानंतर मी सर्वांशी भेटेल असे ट्विटच मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी आज केले. दरम्यान, राज ठाकरे 14 जून रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी त्यांना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. त्यांना मनापासून शुभेच्छा देतात. मोठ्या थाटात त्यांचा वाढदिवस होतो. पण त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरे घरात क्वॉरंटाईन 

राज ठाकरे म्हणाले, दहा दिवसांपासून मी कोविडच्या नियमांनुसार घरातच क्वॉरंटाईन आहे. त्यादरम्यानच माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरेही वाटते, पण, यावर्षी मला 14 तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. गाठीभेटीत परत संसर्ग झाल्यास मला परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागू शकते ती किती पुढे ढकलायची यालाही कालमर्यादा असते असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी