एकनाथाला एकटा पडू देऊ नका - जयदेव ठाकरे 

एकनाथ हा माझा आवडता आहे. त्यामुळे मी त्याच्या प्रेमामुळे मी आज या ठिकाणी आलो आहे. अशी प्रतिक्रिया  बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे सुपूत्र जयदेव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Don't let Eknath be alone - Jaidev Thackeray
एकनाथाला एकटा पडू देऊ नका - जयदेव ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ हा माझा आवडता आहे. त्यामुळे मी त्याच्या प्रेमामुळे मी आज या ठिकाणी आलो आहे. अशी प्रतिक्रिया  बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे सुपूत्र जयदेव ठाकरे यांनी व्यक्त केली.
  • जयदेव ठाकरे आज शिंदे गटाच्या बीकेसी मेळाव्यात उपस्थिती दर्शवली.
  • तर हा ठाकरे कोणत्याही गोठ्यात बांधला जाईल असा नाही आहे, असा टोलाही जयदेव ठाकरे यांनी लगावला. 

मुंबई : एकनाथ हा माझा आवडता आहे. त्यामुळे मी त्याच्या प्रेमामुळे मी आज या ठिकाणी आलो आहे. अशी प्रतिक्रिया  बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे सुपूत्र जयदेव ठाकरे यांनी व्यक्त केली. जयदेव ठाकरे आज शिंदे गटाच्या बीकेसी मेळाव्यात उपस्थिती दर्शवली. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.  (Don't let Eknath be alone - Jaidev Thackeray)

अधिक वाचा : दसऱ्यानिमित्त ठाणे पोलीस मैदानावर शस्त्रपूजन

यावेळी, जयदेव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ आता एकनाथराव झाले आहे. त्यांनी जे काही धडाडीचे कामे केले ती मला आवडली. त्यामुळे त्याच्या प्रेमासाोठी मी या ठिकाणी उपस्थित आहे.  मला अनेक जण विचारत आहे. जयदेव ठाकरे शिंदे गटात सामील झाले का. तर हा ठाकरे कोणत्याही गोठ्यात बांधला जाईल असा नाही आहे, असा टोलाही जयदेव ठाकरे यांनी लगावला. 

अधिक वाचा : पार्टनरशी भांडण झालं तरी या चुका कधीच करू नका

एकनाथ शिंदे याला एकटा पडू देऊ नका.  तुम्ही याला एकनाथच राहू द्या. त्याची साथ कधी सोडू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले आहे.  

बीकेसीवर आज शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते. यात निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी