मुंबई : शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना दररोज नवीन धक्के दिले जात आहेत. दिल्लीत 12 शिवसेना खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी पक्ष वाचवणं आणि पक्षातील नेत्यांची गळती थांबवणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. पन्नास आमदार, शेकडो पदाधिकारी, खासदार गेल्यानंतर कमकुवत झालेल्या पक्षाला आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाला अधिक मजबूत करण्याचं काम करत आहेत. मेळावे, बैठका घेण्याचं सत्र जोरदार चालू आहे. शिंदे गटाकडून धक्के मिळत असताना आदित्य ठाकरेंनी आमदारांना परत एकदा साद घातली आहे.
ज्या आमदारांना मातोश्रीवर परत यायचे आहे त्यांच्यासाठी अजूनही दारे खुली आहेत, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मुंबईतील एक पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांची आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. समर्थकांच्या घोषणा त्यांचा जोश पाहता हा उत्साह आवरा असं स्वत: आदित्य ठाकरेंना सांगावं लागलं. मला सगळ्यांचे चेहरे दिसू द्या, तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे, असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांचा समाचार देखील घेतला.
उद्या बरोबर एक महिना होईल, 20 जूनला जी घाण झाली त्याला एक महिना होईल, ही जी गद्दारी झाली आहे, ती महाराष्ट्रासोबत गद्दरी झाली आहे. रोज बातम्यांमध्ये नाट्य सुरू आहे, पण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली आहे, त्याकडे लक्ष नसल्याचं टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. थोडी जरी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा, आणि मग जो निर्णय असेल तो मान्य असेल. या आमदारांची जमवाजमव कधी सुरू केली जेव्हा उध्दव साहेब यांचे 2 ऑपरेशन झाले. ज्यावेळी ते कोणाला भेटू शकत नव्हते त्यावेळी यांनी जमवाजमव सुरू केली. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं ते आता दाखवून देण्याची गरज आहे.
Read Also : शिवसेनेला आणखी एक झटका, संसदेतही शिंदेशाही; गटनेता ठरला
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे नाट्य आपण खाली पडणारच, हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चाललं आहे. मला एकच समाधान आहे की, या काळात उध्दव साहेब कुटुंब प्रमुख म्हणून समोर आले, असेही ते म्हणाले. हे सर्व स्वतःसोबत किती आमदार येतात, खासदार येतात हे दिल्लीला दाखवायला सुरू आहे. ही बंडखोरी नाही, हे गद्दार आहेत, जर महाराष्ट्राबद्दल यांच्या मनात चांगलं असतं तर ते आधी सुरत मग गुवाहाटी मग गोव्याला गेले नसते. कुर्ल्याला एक इमारत कोसळली तर मी तिथे 2 वाजता होतो, पण बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये मजा-मस्ती करत होते.
Read Also : महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉली सैनीने मिळवलं सुवर्ण पदक
बंडखोर आमदारांना विधानसभेत नजरेला नजर मिळवत नव्हते, त्यांना मी हेच विचारात होतो की आम्ही कमी काय केलं, कदाचित आम्ही राजकारण केलं नाही म्हणून हे झालं असेल. बाळासाहेब कधी विधान भवनात गेले नाहीत म्हणून यांची चोरी कळत नव्हती, पण उध्दव साहेब विधानसभेत गेले तेव्हा चोरी पकडली गेली. असं म्हणताना आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना साद घातली आहे. ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे अजून खुले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.