Double Your Money Tips, घराच्या तिजोरीत ठेवा ही वस्तू, सदैव राहील लक्ष्मीची कृपा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 21:11 IST

Double Your Money Tips in marathi, keep these things in tijori with money : लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे.

Double Your Money Tips in marathi, keep these things in tijori with money
Double Your Money Tips, घराच्या तिजोरीत ठेवा ही वस्तू, सदैव राहील लक्ष्मीची कृपा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Double Your Money Tips, घराच्या तिजोरीत ठेवा ही वस्तू, सदैव राहील लक्ष्मीची कृपा
  • लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी खोटे बोलू नये
  • जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी पण स्वच्छता राखावी

Double Your Money Tips in marathi, keep these things in tijori with money : लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करून कमाई करणे अपेक्षित आहे. तसेच लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी खोटे बोलू नये आणि कोणालाही त्रास देऊ नये. घरात जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीत कायम भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि कमळाचे फूल ठेवावे. घरात स्वच्छता राखावी. तसेच जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी पण स्वच्छता राखावी. यामुळे सदैव लक्ष्मीची कृपा राहते. उत्पन्न वाढते. 

लक्षात ठेवा. उत्पन्न वाढ व्हावी यासाठी दररोज घरात स्वच्छता राखावी. घर नीटनेटके ठेवावे. ज्या ठिकाणी पैसे ठेवता ती जागा पण स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी. ज्या ठिकाणी घरात पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवलेले कमळाचे फूल सुकल्यावर तातडीने बदलावे आणि सुकलेले फूल घराच्या अंगणात किंवा घरातील कुंडीतल्या मातीत मिसळावे. 

हळकुंड लाल धाग्याने बांधून ते पैसे ठेवण्याच्या जागी ठेवले तरी संपत्ती वाढते असे म्हणतात. पिवळ्या रंगछटेच्या कवड्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवले तरी संपत्ती वाढते असे म्हणतात. पैसे ठेवण्याच्या तिजोरीच्या उत्तरेला एक आरसा ठेवला आणि त्यात तिजोरी उघडल्यावर धनसंपत्तीची प्रतिमा दिसेल अशी व्यवस्था केली तर संपत्ती वाढते असे म्हणतात. लाल रंगाच्या कापडात ११ किंवा २१ रुपये बांधून ही पुरचुंडी तिजोरीत ठेवल्यास संपत्ती वाढते असेही अनेकजण सांगतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी