डॉ. अमरसिंह निकम यांना कामाची पावती! जर्मनीतील डॉ. सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Dr Samuel Hahnemann Award : प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने जर्मनी येथे सन्मानित करण्यात आले.

Dr. Amar Singh Nikam honored with Samuel Hahnemann International Award
डॉ. अमरसिंह निकम यांना कामाची पावती! जर्मनीतील डॉ. सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डॉ. अमरसिंह निकम यांना आंतराराष्ट्रीय पुरस्कार
  • होमिओपॅथीमध्ये मोलाचे योगदान
  • 'डॉ.सॅम्युएल हनिमन पुरस्काराने जर्मनीत सन्मान

Dr Samuel Hahnemann Award 2023 : जगभरातील वैद्यकिय क्षेत्रात  'डॉ.सॅम्युएल हनिमन पुरस्कार सोहळ्या'ची प्रत्येकजण आतुरतेनं वाट बघत असतात. जर्मनीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात होमिओपॅथीमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या डॉ. अमरसिंह निकम यांचा हृद्य सन्मान सोहळा झाला. (Dr. Amar Singh Nikam honored with Samuel Hahnemann International Award)

अधिक वाचा : Mumbai Mega Block : रविवारी रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक; कधी, कुठे अन् कसा?

डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन, जर्मनी या ठिकाणी एक अभूतपूर्व सोहळा पार पडला. यावेळी डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ. अमरसिंह निकम यांना सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा : पंकजा मुंडेंच्या ताब्यातील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड, भावा-बहिणीत नेमकं चाललंय काय?

डॉ. अमरसिंह निकम चाळीस वर्ष होमिओपॅथी द्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथी मध्ये संशोधन करून होमिओपॅथी मधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने चालवत आहेत. हजारो हृदय, किडनी, लिव्हर फेल्युअर यांसारख्या असाध्य रोगांना बरे करत जागतिक पातळीवर होमिओपॅथीला उत्तम आणि उच्च दर्जा देऊन तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवले. मिशन होमिओपॅथी संघटना स्थापन करून शंभर डॉक्टरांची टीम तयार केली जी जगभर मोठमोठ्या शहरात, खेड्यापाड्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीचा प्रसार करण्याचे योगदान निरंतर करत आहे. त्याचबरोबर कोविड सारख्या महामारीत दिवस-रात्र निर्भीडपणे कोविड महामारी थोपवण्याचे काम केले.

अधिक वाचा : कडबा कुट्टीसह भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम, सौ. डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. त्यावेळी सौ. सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील असंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. हा सोहळा आय. एच. झेड. टी. या संस्थेने आयोजित केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी