Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन; राज्यभरात भीम जंयतीची जय्यत तयारी

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 10:20 IST

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील चैत्यभूमीला पोहोचले असून, त्यांनी महामानवाला अभिवादन केले आहे. त्याच्यांसोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत.

Chief Minister Uddhav Thackeray greets Dr. Babasaheb Ambedkar
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील चैत्यभूमीला पोहोचले असून, त्यांनी महामानवाला अभिवादन केले आहे. त्याच्यांसोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत. राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे निर्बंध आणले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज आंबेडकर जयंती मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी ठिकठिकाणी सुरू आहे. राज्यभरात रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत व मोठ्या मैदानांतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीला महामानवाला अभिवादन केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरू आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

यंदा मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी दिवसभर कामाची पाहणी सुरू होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी