'नवा गडी नवं राज्य', PMO मधला 'बुलडोझर मॅन' आता फडणवीसांच्या दरबारात

राज्यात नवी शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पीएमओमध्ये काम केले कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

Dr. Shrikar Pardeshi has been appointed as the Secretary to Deputy Chief Minister Devendra Fadnavis.
'नवा गडी नवं राज्य', PMO मधला 'बुलडोझर मॅन' आता फडणवीसांच्या दरबारात ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डॉ. श्रीकर परदेशी यांची फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
  • त्यांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी काम केले आहे
  • त्यांची बुलडोझर मॅन म्हणून ओळख

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. पंतप्रधान कार्यालयात तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत कारकीर्द गाजवणारे 'बुलडोझर मॅन' डॉ.श्रीकर परदेशी यांची ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr. Shrikar Pardeshi has been appointed as the Secretary to Deputy Chief Minister Devendra Fadnavis.)

अधिक वाचा : 'काय तो दांडा आणि काय ते ढुंXX' म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या सेनेच्या प्रवक्त्या एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्षम व वेगाने निर्णय घेणारे नेते मानले जाते. ते दिवसातील 18 तास काम करतात. आपल्या पंतप्रधान कार्यालयातील कारभाराला गती देणे व त्याची तत्पर अंमलबजावणी करणे यासाठी मोदींनी वेगवेगळ्या प्रातांतून, राज्यातून सनदी अधिका-यांचा एक चमू तयार केला आहे. यात महाराष्ट्र राज्याचे सुपूत्र श्रीकर  परदेशींचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयात एप्रिल 2015 पासून परदेशी संचालकपदावर कार्यरत होते.  काही महिन्यांपूर्वीत डॉ. परदेशी केंद्रातील प्रतिनियुक्तीचा कालावधी आटोपून राज्यात परत होते. तेव्हा ठाकरे सरकारने त्यांच्याकडे ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी दिली होती.

अधिक वाचा : Big Breaking: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीस तुर्तास स्थगिती, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

श्रीकर परदेशी हे 2001 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा यापूर्वीचा ट्रॅक रेकाॅर्ड जबरदस्त असून त्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी असताना बोगस शाळा व शिक्षक तसेच सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आणले होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून काम करताना अवैध बांधकामे पाडल्यामुळे श्रीकर परदेशींना 'बुलडोजर मॅन' ही उपाधी दिली गेली. त्याच बुलडोजर मॅन डाॅ. श्रीकर परदेशी यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी