तस्करांना अटक, डीआरआयने जप्त केले ५.८८ किलो सोनं

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 11, 2022 | 10:22 IST

DRI foiled attempts of organised gold smuggling though air route by effecting two successive seizures in Lucknow and Mumbai : डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence - DRI) पथकाने पाळत ठेवून लखनऊ आणि मुंबई अशा दोन ठिकाणी विमानतळ परिसरात कारवाई केली. या कारवाईद्वारे ५.८८ किलो सोनं जप्त करण्यात आले.

DRI foiled attempts of organised gold smuggling though air route by effecting two successive seizures in Lucknow and Mumbai
तस्करांना अटक, डीआरआयने जप्त केले ५.८८ किलो सोनं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तस्करांना अटक, डीआरआयने जप्त केले ५.८८ किलो सोनं
  • जप्त केलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३.१० कोटी रुपये
  • मोटर रोटरमध्ये वर्तुळाकार आकारात घट्ट बसवून सोनं घेऊन प्रवासी तस्करी करत होते

DRI foiled attempts of organised gold smuggling though air route by effecting two successive seizures in Lucknow and Mumbai : मुंबई : डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence - DRI) पथकाने पाळत ठेवून लखनऊ आणि मुंबई अशा दोन ठिकाणी विमानतळ परिसरात कारवाई केली. या कारवाईद्वारे ५.८८ किलो सोनं जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३.१० कोटी रुपये आहे. 

एका छोट्या यंत्राचे सुटे भाग घेऊन जात असल्याचे दाखवून प्रवासी स्वतःसोबत मोटर रोटर घेऊन विमानतळावर यायचे. या मोटर रोटरमध्ये वर्तुळाकार आकारात घट्ट बसवून सोनं घेऊन प्रवासी तस्करी करत होते. योग्य टप्प्यावर तस्कर मोटर रोटर पुढील व्यक्तीकडे देऊन सोनं नियोजीत ठिकाणी पोहोचविण्याची खबरदारी घेणार होते. पण डीआरआयने कारवाई करून तस्करांचा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणात दक्षिण मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली आहे. अटक झालेल्या व्यक्तीची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

तस्कर एकसमान पद्धत वापरून मुंबई आणि लखनऊ येथे सोन्याची तस्करी करत असल्याचे पाळत ठेवल्यावर लक्षात आले. यानंतर डीआरआयने नियोजन करून ४८ तासांच्या आत मुंबई आणि लखनऊमध्ये तस्करांना पकडले आणि सोनं जप्त केले. 

पहिली कारवाई लखनऊ येथे झाली. या ५ मे रोजी झालेल्या कारवाईत लखनऊमध्ये सोन्याची जप्ती झाली. नंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत कारवाई करण्यात आली. 

डीआरआयने २०२१-२२ मध्ये वेगवेगळ्या कारवायांमधून ८३३ किलो सोनं जप्त केले. यानंतरही डीआरआयची कारवाई सुरू आहे. तस्करांची कोंडी करण्यासाठी डीआरआय प्रयत्न करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी