Drugs In Mumbai : मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स तस्करी करणार्या एका आरोपीला अटक केली. मुंबईत कुठल्या राज्यातून ड्रग्स येतात आणि ते मुंबईत कसे पोहोचतात याचा पोलिसांनी शोध घेतला आहे. मुंबईत ड्रग्स आणण्यासाठी ड्रग पेडलर खासगी नव्हे तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात असा खुलासा या ड्रग पेडलरने केले आहे. ज्या वाहतूक व्यवस्थेचा कोट्यवधी प्रवासी वापर करतात त्यातून ड्रग्सची ने आण करणे सोपे असते या ड्रग पेडलरने म्हटले आहे.
राजस्थानमधून कोट्यवधी रुपयांचे ड्रग मुंबईत येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी बोरीवली स्थानकावर सापळा रचला होता. तेव्हा अमानुल्लाह खान या आरोपीकडे एक कोटी रुपयांचे हेरॉईन आढळले. या ड्रग्सची आंतराराष्ट्र्रीय बाजारात किमंत ३ कोटी रुपये इतकी आहे. बस किंवा ट्रेनमधून अंमली पदार्थ आणने कमी धोक्याचे असते असे आरोपी अमानुल्लाह खानने म्हटले आहे. हे ड्रग दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत विकले जाणार होते. परंतु मुंबई पोलिसांनी वेळीच या ड्रग पेडलरला अटक केली आहे त्यामुळे त्यांचा ही डील फसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन आणि बसच्या माध्यमातून सर्वाधिक ड्रग्सचा पुरवठा होत आहे. मुंबई आणि राजस्थानमधील अंतर कमी आहे आणि वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. राजस्थानच्या प्रतापगढ, चितौडगढ आणि अजमेर शहरांतून मुंबईत अंमली पदार्थांचा पुरवठा होत आहे. हे अंमली पदार्थ राजस्थानच्या देवल नावाच्या गावतून या शहरांमध्ये पोहोचवले जाते, त्यानंतर हे अंमली पदार्थ मुंबईत आणले जातात. ट्रेन आणि बसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मुंबई आणणार्या ६ ड्रग पेडलर्संना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेला ड्रग्स विकल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती. या महिलेकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.