मुंबई : बंडखोरी केलेल्या आमदारांची आमदारकी रद्द होईल, असाच निर्णय कोर्टाकडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, बंडखोरी केलेल्या आमदारांवर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बंडखोरी करत आपला वेगळा गट तयार केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या आमदारांवर कारवाई व्हायला हवी असं जयंत पाटील यांनी म्हटला आहे.
अधिक वाचा ; मालदीवमध्ये 'जन गण मन'चे सूर, पहिल्याच दिवशी चार सुवर्ण पदक
दरम्यान, जयत पाटील म्हणाले की, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मला खत्री आहे की, निवृत्ती पूर्वी ते चांगला निर्णय देतील. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, बंडखोरी केलेल्या आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. असंही पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हाणाले की, वीजेचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. ही दर वाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. एकीकडे पेट्रोल डिझेलवर दिलासा दिला आणि दुसरीकडे वीज दरवाढ केली आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
अधिक वाचा ; एसटीच्याभीषण अपघातातील १३ पैकी ८ मृतदेहाची ओळख पटली
शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर, आज एसटी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांची मदत द्यावी अशी देखील मागणी केली आहे. आंम्ही मंजूर केलेल्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून तातडीने मदतकार्य सुरू करावं अशी विनंती केली आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, डॉलर उच्चांकीवरून दबावाखाली
शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी झाली. परंतु, कोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. खंडपीठात बुधवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. तर, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ स्थापन झाले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.