दसरा मेळावा: माझा वाडा चिरेबंद, तडा जाणार नाही - उद्धव ठाकरे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 15, 2021 | 23:56 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या षण्मुखानंद नाट्यगृह येथे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. माझा वाडा चिरेबंद आहे आणि तुमच्या चिरकण्याने त्याला तडा जाणार नाही; असे उद्धव ठाकरे भाजपचे नाव न घेता म्हणाले.

dussehra melava 2021 uddhav thackeray speech
दसरा मेळावा: माझा वाडा चिरेबंद, तडा जाणार नाही - उद्धव ठाकरे 
थोडं पण कामाचं
 • दसरा मेळावा: माझा वाडा चिरेबंद, तडा जाणार नाही - उद्धव ठाकरे
 • शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन दाखवेन - उद्धव ठाकरे
 • मी मुख्यमंत्री नाही, तुमच्या घरातील एक सदस्य, एक भाऊ आहे - उद्धव ठाकरे

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या षण्मुखानंद नाट्यगृह येथे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. माझा वाडा चिरेबंद आहे आणि तुमच्या चिरकण्याने त्याला तडा जाणार नाही; असे उद्धव ठाकरे भाजपचे नाव न घेता म्हणाले.माझा आवाज दाबून टाकणारा जन्माला आला नाही आणि कधी येणार नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या पक्षाला आज एवढी वर्ष झाली. दरवर्षी दसरा मेळाव्यात आधी बाळासाहेब आणि आता मी तुमची (शिवसैनिकांची) पूजा करतो. कारण शिवसैनिक हेच माझे शस्त्र आहे; असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवसैनिक हे माझं कुटुंब आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी शिवसैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. शिवसैनिकांना आणि राज्यातील जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं नाही तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटणं आवश्यक आहे; असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली. भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवते पण पोटनिवडणुकांमध्ये उसने घेतलेले उमेदवार उभे करते. भाजप राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करत आहे; असे घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपला राजकीय सत्तेचे व्यसन जडले आहे; असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी १९९२-९३च्या आठवणी जागवत त्यावेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरला म्हणून आज भाजप आहे असे सांगितले. या वक्तव्यावर शिवसैनिकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. सत्तेसाठी भाजप त्यांच्या हाती असलेल्या सर्व यंत्रणेचा आणि उपलब्ध प्रत्येक पर्यायाचा पुरेपूर वापर करत आहे; असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

२६-११चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी मुंबईला वाचवण्यासाठी प्राण पणाला लावले. ओंबळे, कामटे, करकरे या पोलिसांनी बलिदान दिले. आज या पोलीस दलालाच माफिया म्हणत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्यांवर टीका केली. माताभगिनींचा मान राखतो म्हणूनच घटना घडल्यावर तातडीने आरोपीला अटक झाली असे सांगत आरोपीला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही; असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी भाजप महाराष्ट्राला बदनाम करत आहे आणि राज्यातील भूमिपुत्रांच्या संधी हिसकावून घेण्याचे उद्योग करत आहे; असा आरोप केला. हिंदुत्वाची शिडी करुन राजकारण करणारे तोडा फोडा आणि राज्य करा ही निती वापरुन कारभार करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

महत्त्वाचे मुद्दे - 

 1. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला सुरुवात
 2. आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. 
 3. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे. काहींना वाटत. पद येतील सत्ता येईल जाईल. अहमपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस हा संस्कार. आशिर्वाद हीच माझी ताकद
 4. माझे भाषण संपल्याची काही जण वाट बघताहेत. चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडे विकृती. त्यांना ती रोजगार हमी. 
 5. हर्षवर्धन पाटील बोलले भाजपात का गेलो? अशी लोक भाजपाची ब्रँड अँबेसेडर. टीव्ही वरील जाहिरातीचा संदर्भ. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आले तर सोडत नाही. ईडी सीबीआयच्या माध्यामातून येऊ नका. समोरासमोर या हे मर्दाचे हिंदुत्वाचे लक्षण नाही. बंगाल सारखे लढण्याची तयारी दाखवा. 
 6. हिंदुत्व आता धोक्यात इंग्रजांची निती वापरून भेद केल्या जातो. शिवसेनाप्रमुखांचा मराठी म्हणून एकत्र या. मराठी अमराठी भेद होऊ देऊ नका. मराठा तितुका मेळवावा हिंदुत्व वाढवाव
 7. आपले आणि RSS चे विचार एकच मार्ग वेगळे. शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर तुम्ही पण मुख्यमंत्री राहिला असता. शिवसेनाप्रमुखांचे वचन म्हणून जबाबदारी घेतली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेलच. हे माझे क्षेत्र नाही. झोली वगैरे कर्मदरिद्री विचार आपले नाही. 
 8. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. घराबाहेर देश प्रथम. भागवत भाषणांचे २०२० व २०२१ चे संदर्भ. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? हे मोहनजींना जनतेला मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको- भागवत, सध्या जे काही सुरू आहे तुमच्या लोकांची शिकवणी लावा. सत्तेचे व्यसन हा अंमली पदार्थ आहे. अनेक प्रयत्न सरकार पाडण्याचे झाले दोन वर्ष. छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. देशाचा अमृत महोत्सव. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल त्यावेळी समोर. ममतांचे आजच्या संघर्षासाठी अभिनंदन.  ९२-९३ साली शिवसेना होती म्हणून तुम्ही आहात. केंद्रिय गृहमंत्रालयाने सांगितले हिंदुत्वाला धोका नाही. आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे. सावरकर गांधी कधी वाचलेत का? जर हिंदुत्वाला धोका होते तेव्हा फक्त एकमेव हिंदुह्दयसम्राट उभे होते. शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पाडल्यावर सुध्दा गर्व से कहो हम हिंदू है म्हणाले. बाकीचे थरथरत होते.
 9. दंगलीत एका महिलेचा दंगलखोरांनी केलेले हाल कथन शिवसैनिकांनी मदत केली. तुमची पालखी वाहत नाही म्हणून आरोप करता. आम्ही हिंदुत्वाचे भारतमातेचे भोई आहे. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर षंढपणा आहे. 
 10. दोन्ही पोटनिवडणुकीत जगातल्या मोठा पक्षाकडे उपरे उमेदवार. शिवसेनेचे काम दाखवणारी चित्रफीत हीच वक्ता. एकनाथ शिंदेंचे धन्यवाद कारण ठाणेकरांनी ९ दिवस रक्तदान केले ही समाजसेवा इतर कुठल्याच पक्षाकडे नाही. रक्तदानात भेदभाव नाही. विक्रमी शिबीर ठाण्यात.
 11. राज्यपालांनी पत्र लिहिले. आम्हाला माता भगिनींचा सन्मान आमच्यात आहे. बलात्कार करणाऱ्याला  फासावर लटकवल्या शिवाय स्वस्थ नाही. राज्यपालांना दिलेल्या उत्तराचे समर्थन. कायदा कडक शासन सगळं करतोहोत. देशात घडू नये यासाठी काय करणार मोदींना अधिवेशन घ्यायला सांगितले. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे. उत्तर प्रदेशात काय सुरु आहे. २६ नोव्हेंबर ज्यांनी बलिदान केले त्या खात्याला माफीया म्हणणे चूक. 
 12. काहींच्या घरी २४ तास शिमगा. उत्तरप्रदेशातचे पोलीस काय भारत रत्न आहेत. महाराष्ट्र सत्तेला नव्हे सत्याला जगणारा आहे. सावरकर गांधी चिरकुट वाद घालणाऱ्यांनी देशासाठी काय केले? आंदोलन स्वातंत्र्य काळात योगदान नाही. तुम्ही ७५ वर्षात देशात काय केले. नुसती रोषणाई करायची? या वर्षी काही बाबतीत उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले गेले. आणीबाणी,  परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी बंद करावे.
 13. मार्मिक सदर वाचा आणि थंड बसा. भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाला वाचा. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी आहे. परंतु समानतेची हिंदुत्वाची शिवसैनिकांना शिकवण. सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा. 
 14. केंद्रीय मंत्री सोनवाल यांचा निधी गुजरातला वळवण्याचा फतवा. माहिती अधिकारात अनेक गैरप्रकार उघड. जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा चरसचा व्यापार सुरु आहे असे एक चित्र उभे करायचे. मुंद्रा अदानी बंदर कुठे येते? दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे.महाराष्ट्रात दीडशे कोटी पोलीसांनी जप्त केला. कॅगचे ताशेरे गुजरात निधी बाबत.
 15. दहा हजार कोटी अतिवृष्टी साठी दिले. कोविडसाठी निधी यांचा केंद्राकडे. केवळ टीका म्हणून नाही. आपल्या देशात युवा शक्ती मोठी. त्यांच्या रिकाम्या हाताला काम नाही. तरुण गुन्ह्याकडे का वळतोय? व्यवस्थित ही शक्ती घडवावी लागेल नुसत सत्ता हवी म्हणून होणार नाही अगोदर चूल पेटवा. चीन मधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करु नका. मराठी भाषा भवन उभे राहणार. संभाजीनगरला संतपीठ. मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालन, मत्सालय, लष्कराचे संग्राहलय उभे करणार.
 16. लढाई न बघितल्याने स्वातंत्र्याबाबत विस्मरण. सैनिक विपरित हवामानात पहारे देतात. दालनात सैनिक पहारा देतात ते वातावरण अनुभवायला मिळेल. लढ्यात सहभागी नव्हता निदान संग्राहलयात तरी सहभागी व्हा.
 17.  हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगाल प्रमाणे तुमची तयारी आहे? (प्रचंड प्रतिसाद)मराठी अमराठी भेद करु नका. मराठी म्हणून एक व्हा मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदुत्व सुध्दा वाढवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी