Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर, मुंबईतील वरळी भागातील घरावर जप्तीची कारवाई

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 21, 2022 | 19:51 IST

Praful Patel property attached by ED: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. 

Praful Patel
प्रफुल्ल पटेल (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर
  • मुंबईतील वरळी भागातील घरावर ईडीकडून जप्तीची कारवाई 

Ed action against Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (ED attached property of NCP leader Praful Patel in Worli area of Mumbai)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊस येथील घरावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्यासोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

२०१९ पासून ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची चौकशी सुरू आहे. मुंबईतील वरळी भागात सीजे हाऊस ही प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होता. त्यानंतर ईडीने आपला तपास सुरू केला आणि अनेक नागरिकांचे जबाबही नोंदवले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही समन्स मधल्या काळात पाठवून त्यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. या सीजे हाऊसमध्ये इक्लाब मिर्चीची असलेली संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. आता या इमारतीमधील प्रफुल्ल पटेल यांचा फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा : शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'

गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. मिर्चीच्या कुटुंबासोबत पटेलांनी करार केलेला आणि त्या करारात इक्बाल मिर्ची याची जागा होती. वरळीतील सीजे हाऊस येथे आधी लहान इमारत होती आणि ती इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या इमारतीचं रिडेव्हलपमेंट हे प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केलं होतं. त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ईडीला होता.

अधिक वाचा : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरुन धमकीचा मेसेज

त्याच आधारे ईडीने आपला तपास सुरू केला होता. त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांची यापूर्वी चौकशी सुद्धा झाली होती आणि आता या प्रॉपर्टीमधील पटेलांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर या सीजे हाऊसमधील इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित संपत्ती यापूर्वीच ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी