National Herald Case: ED घेणार राहुल गांधींची शाळा, १३ जूनला हजर होण्याचे समन्स

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 03, 2022 | 16:06 IST

ED issues fresh summons to Rahul Gandhi to appear before investigators on June 13 in National Herald case : नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी चौकशीकरिता ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नवे समन्स बजावले.

ED issues fresh summons to Rahul Gandhi to appear before investigators on June 13 in National Herald case
National Herald Case: ED घेणार राहुल गांधींची शाळा, १३ जूनला हजर होण्याचे समन्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • National Herald Case: ED घेणार राहुल गांधींची शाळा, १३ जूनला हजर होण्याचे समन्स
  • राहुल गांधींव्यतिरिक्त ईडीने नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावले
  • सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीकरिता हजर राहण्याचे समन्स

ED issues fresh summons to Rahul Gandhi to appear before investigators on June 13 in National Herald case : नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी चौकशीकरिता ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नवे समन्स बजावले. राहुल गांधी यांना आधी २ जून रोजी चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले होते. पण परदेशात असल्यामुळे राहुल गांधी २ जून रोजी चौकशीला उपस्थित नव्हते. यानंतर ईडीने राहुल गांधींना नवे समन्स बजावले. आता राहुल गांधी यांना १३ जून २०२२ रोजी चौकशीकरिता हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. 

राहुल गांधींव्यतिरिक्त ईडीने नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीकरिता हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. पण गुरुवार २ जून २०२२ रोजी सोनिया गांधी सौम्य स्वरुपाचा कोरोना झाला असून त्या होम क्वारंटाइन झाल्या आहेत, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली 

व्यवहाराबाबत संशय

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 

हा होता आक्षेप

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या एजेएल संस्थेला 90 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्यानंतर मालकी हस्तांतरित करताना यंग इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावे त्यातील 50 लाख रुपये कर्ज हस्तांतरित करण्यात आलं. कर चुकवण्यासाठी हा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी