Iqbal Singh Chahal: कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) बीएमसी (BMC) आयुक्त (Commissioner)इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal)यांना ईडीने (ED) समन्स पाठवला आहे. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.( ED notice to Iqbal Singh Chahal in 100 crore scam case)
अधिक वाचा : Bus Accident : शिर्डीला निघालेल्या बसची ट्रकशी टक्कर, 10 ठार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर चहल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवल्याची बातमी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे.
अधिक वाचा : ST कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, वेतनासाठी 300 कोटीचा निधी
सोमवारी कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी या, असा आदेश ईडीने चहल यांना समन्सच्या माध्यमातून दिलाय. कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच संदर्भात इक्बाल सिंह चहल यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले.
अधिक वाचा : मकर संक्रांतीचा सण का साजरा केला जातो, जाणून घ्या
मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केलाय. किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदानात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून 2020 ते मार्च 2022 पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते.
या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर साहेब ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राट मधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आले होते. शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे. ही गोष्ट माहिती असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली होती.
अधिक वाचा : मकरसंक्रांती 14ला आहे की 15 तारखेला, गोंधळलात का?
आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसीकडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले. मात्र बीएमसीकडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आता बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस पाठवली आहे.
ईडीने इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इक्बाल सिंह चहल गेल्या 140 दिवसांपासून संजय राऊत यांच्या पार्टनरला का वाचवत आहेत? हेच समजत नाहीय”. “संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजीत पाटकरव यांनी खुल्लम खुल्ला 100 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्याचं काम इक्बाल सिंह चहल करत आहेत”,असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.