अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 26, 2022 | 09:57 IST

ED raids 7 premises linked to Shiv Sena minister Anil Parab in Maharashtra : महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधात ईडीने (Enforcement Directorate - ED) कारवाई सुरू केली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीची धाड पडली आहे.

ED raids 7 premises linked to Shiv Sena minister Anil Parab in Maharashtra
अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई 
थोडं पण कामाचं
  • अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई
  • अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीची धाड पडली
  • अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला

ED raids 7 premises linked to Shiv Sena minister Anil Parab in Maharashtra : मुंबई : महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधात ईडीने (Enforcement Directorate - ED) कारवाई सुरू केली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीची धाड पडली आहे. या कारवाईतून हाती येणाऱ्या माहितीआधारे ईडी अनिल परब यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मंत्रिमडळाची १२ वाजता तातडीची बैठक असल्याचे समजते.

ईडीने मुंबई, पुणे आणि दापोली या तीन ठिकाणी अनिल परब यांच्याशी संबंधित सात जागांवर धाड टाकली आहे. मुंबईत अनिल परब यांचे शासकीय निवास्थान शिवालय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी ईडीची धाड पडली आहे. अनिल परब यांच्या सीएवर पण धाड पडली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक आणि ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते सध्या तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंग (Prevention of Money Laundering Act - PMLA) अर्थात आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी देशमुख आणि मलिक यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पाठोपाठ अनिल परब यांच्या विरोधातही ईडीने मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

ठोस पुरावा असल्याशिवाय ईडी गुन्हा दाखल करत नाही. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे अनिल परब यांनी बॅग भरायला सुरुवात करावी; असे भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी