Patra chawl scam case : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स; आज चौकशी

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 23, 2022 | 09:18 IST

शिवसेना (Shiv Sena) खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्धात पुराव्या जोडण्यात ईडी हात धूवून लागली आहे. संजय राऊत यांना ईडीनं अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना पत्राचाळ घोटाळा (Patra chawl scam) प्रकरणात ईडीनं (ED) आज स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांना चौकशीसाठी बोलावलं असून स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे.  

 Summons to Swapna Patkar by ED
पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.
  • स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
  • स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे.

Patra Chawl Scam Case :  शिवसेना (Shiv Sena) खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्धात पुराव्या जोडण्यात ईडी हात धूवून लागली आहे. संजय राऊत यांना ईडीनं अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना पत्राचाळ घोटाळा (Patra chawl scam) प्रकरणात ईडीनं (ED) आज स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांना चौकशीसाठी बोलावलं असून स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे.  

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. 

Read Also : ईडीची पीडा दूर होण्यासाठी जॅकलिन देवाच्या दारी

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांचीही ईडीनं चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read Also : भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे 5 डब्बे रुळावरुन घसरले

काय आहे पत्रचाळ प्रकरण?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी