पश्चिम रेल्वे २२ नोव्हेंबरपासून ८ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 20, 2021 | 08:50 IST

Eight new Western Railway AC services from Monday पश्चिम रेल्वे २२ नोव्हेंबरपासून चर्चगेट-विरार मार्गावर ८ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-विरार मार्गावरील एसी फेऱ्यांची संख्या १२ वरुन वाढून २० होईल.

Eight new Western Railway AC services from Monday
पश्चिम रेल्वे २२ नोव्हेंबरपासून ८ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करणार 
थोडं पण कामाचं
  • पश्चिम रेल्वे २२ नोव्हेंबरपासून ८ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करणार
  • पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-विरार मार्गावरील एसी फेऱ्यांची संख्या २० होईल
  • नव्या फेऱ्यांपैकी चार अप आणि चार डाऊन दिशेला

Eight new Western Railway AC services from Monday मुंबईः पश्चिम रेल्वे २२ नोव्हेंबरपासून चर्चगेट-विरार मार्गावर ८ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-विरार मार्गावरील एसी फेऱ्यांची संख्या १२ वरुन वाढून २० होईल.

नव्याने सुरू होत असलेल्या आठ एसी लोकल फेऱ्यांपैकी चार चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गाच्या तर चार चर्चगेटहून सुटणाऱ्या डाऊन मार्गाच्या एसी लोकल फेऱ्या आहेत. यापैकी एक अप आणि एक डाऊन एसी लोकल फेरी गर्दीच्या वेळेत असेल.

दिवसातील पहिली एसी लोकल फेरी विरारहून चर्चगेटच्या दिशेने सकाळी ८.३३ वाजता सुटेल. दिवसातील शेवटची एसी लोकल फेरी चर्चगेटहून रात्री ८.२७ वाजता सुटेल. नव्या सेवा सुरू करताना चर्चगेट आणि वांद्रे दरम्यानच्या दोन धीम्या लोकल सेवा (स्लो लोकल) रद्द केल्या जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी