निवासस्थान घेतलं आता शिंदेंना हवं सेनेचं निशाण? एकनाथ शिंदेंनी आखली नवीन रणनीती

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 23, 2022 | 10:19 IST

गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणातील (Politics) भूकंपाचे झटके लागत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief) उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) सामान्य मराठी माणसांना याचा जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेत (Shiv Sena ) आतापर्यंत अनेक बंड झाली परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान करेल असा कोणताच बंड कोणाच्या लक्षात नाही. एकनाथ शिंदेंनी फक्त आमदारच फोडले नाहीतर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पक्षप्रमुखांच्या आत्मविश्वासाला देखील खिंडार पाडलं आहे.

Shinde's attempt to keep Shiv Sena as his original party
शिवसेना हा मूळ पक्ष आपल्या गटाकडे ठेवण्याचे शिंदेंचे प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदेंना हवा धनुष्यबाण चिन्हं
  • कायदेशीर लढाईसाठी एकनाथ शिंदेंबरोबर भाजपच्या कायदे पंडितांची मोठी फौज
  • संपूर्ण शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच पुढचे काही दिवस त्यांच्याकडून कायदेशीर लढाई लढली जाणार

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणातील (Politics) भूकंपाचे झटके लागत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief) उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) सामान्य मराठी माणसांना याचा जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेत (Shiv Sena ) आतापर्यंत अनेक बंड झाली परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान करेल असा कोणताच बंड कोणाच्या लक्षात नाही. एकनाथ शिंदेंनी फक्त आमदारच फोडले नाहीतर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पक्षप्रमुखांच्या आत्मविश्वासाला देखील खिंडार पाडलं आहे. दरम्यान शिंदेंनी अजून एक नवीन रणनीती आखली असून शिंदे आता निशाणंही आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.    

Read Also : 'साहेब मोठा निर्णय घ्या' सेना नेत्याची उद्धव ठाकरेंना विनंती

भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करायचे की नाही; तसेच ते कशा पद्धतीने करायचे यापेक्षा शिवेसना हा मूळ पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसे येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या कायदेशीर लढाईसाठी भाजपच्या कायदे पंडितांची मोठी फौजही त्यांच्यासोबत असल्याचे समजते. यामध्ये शिंदे यांना सहजा-सहजी यश मिळणे कठीण असले तरी या मुद्यावरून संपूर्ण शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच पुढचे काही दिवस त्यांच्याकडून कायदेशीर लढाई लढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान बंड केल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार सहयोगी हे नेहमी म्हणत आहेत. आम्ही पक्ष सोडला नाही. तसेच कोणता दुसरा निर्णय घेतला नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णयही आम्ही घेतला नसल्याचं म्हणत आले आहेत. आता त्यामागील शिंदेची रणनीती समोर आली आहे. 

शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून तिथे आमदार अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी तातडीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवून अशा प्रकारची कारवाई बेकायदा असल्याचे सांगितले. ३४ आमदारांच्या सह्या घेऊन त्यांनी मुख्य पक्ष प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदाबरोबरच शिवसेना हा मूळ पक्ष आपल्याकडेच कसा राहील; तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील आपल्याकडेच राहील यासाठीही त्यांनी कायदेशीर कारवाईची रणनीती आखायला सुरुवात केल्याचे समजते.

Read Also : संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन

शिवसेना हा मूळ पक्ष आपल्याकडे गटाकडे राहिल्यास, बंडखोर आमदार गद्दार नसून ते मूळ शिवसैनिक आहेत, अशाप्रकारचा दावा त्यांना करता येणार आहे. त्यासाठीच ते वारंवार आम्ही हिंदुत्वाच्या वाटेवर चालतोय, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत, अशी विधाने करीत आहेत. शिवसेना पक्षावरच दावा करण्यासाठी त्यांना भाजपच्या कायदेशीर जाणकारांची मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असल्याचे समजते. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांची, विधिमंडळातील काही जुन्याजाणत्या अधिकाऱ्यांची; तसेच राजभवनमधील कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याचे समजते.

पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गेल्या २४ तासांत फुटून बाहेर पडले आहेत. तर, काही आमदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गाफील ठेवायचे, त्यांची माहिती बेमालुमपणे शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि ऐन वेळी परिस्थितीनुसार शिंदे यांच्या गटात उडी मारायची, अशा प्रकारचीही रणनीती केली असावी असा कावयास लावला जात आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी