Maharashtra Government decision: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीत आगामी मनपा निवडणुकांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मनपाच्या निवडणुका २०१७ साल प्रमाणेच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत.
मुंबई-ठाण्यातील वॉर्ड रचना ही शिवसेनेच्या सोईची असल्याचं बोललं जात होतं. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्डची संख्या ही नियमबाह्य पद्धतीने वाढवली आणि त्यामुळे ती पद्धत रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात भाजपने आधीच विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता हा निर्णयच बदलण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मविआला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. कारण, प्रभाग रचना बदलून प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता आणि आता हा निर्णय बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
अधिक वाचा : Uddhav Thackeray यांची चूक भोवणार? Eknath Shinde गटाला दिलासा मिळणार
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार, २०१७ साली वॉर्डची रचना आणि संख्या ठरवण्यात आली होती. त्या वॉर्ड रचनेनुसारच आता निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. २०२१ रोजी जनगणना अपेक्षित होती मात्र, कोविडच्या संकटामुळे ही जनगणना झाली नाही. त्यामुळे आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या २०१७ सालच्या प्रभागर रचनेनुसारच घेण्यात येणार असल्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबईत २२७ वॉर्ड आहेत आणि ते वाढवून २३६ वॉर्ड करण्यात आले होते. पण आता शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जुन्या (२२७) वॉर्ड नुसारच निवडणुका होणार आहेत. यासोबतच ठाणे, नवी मुंबई, पुणे यासारख्या एकूण ११ मनपातील वाढीव वॉर्डलाही स्थगिती दिली जाणार आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या वॉर्डमध्येही वाढ करण्यात आली होती ती सुद्धा आता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.