शिंदे आणि भाजपचं राज्यात मिशन २००; एकनाथ शिंदेंची नजर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर?

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 17, 2022 | 14:19 IST

Maharashtra Politics news: राज्यातील शिवसेनेचे आमदार फुटल्याने मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर आता राज्यातील आणखी काही आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. 

Eknath shinde claims that maharashtras 200 mla will vote for nda candidate draupadi murmu in presidential election 2022
शिंदे आणि भाजपचं राज्यात मिशन २००; एकनाथ शिंदेंची नजर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? 
  • एकनाथ शिंदे आणि भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर नजर? 
  • राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील २०० आमदार मतदान करणार

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या एकूण ५० आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dycm Devendra Fadnavis) बनले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि शिवसेनेला एक मोठा धक्का बसला. या धक्क्यातून राजकीय नेते सावरत असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विरोधी बाकावरील १५ आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू हा उमेदवार आहेत. या निवडणुकीत राज्यातील २०० आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सध्यस्थितीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांची संख्या १७० इतकी आहे. तर शिवसेनेने या निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यातील एकूण आमदारांची संख्या ही १८५ वर पोहोचली आहे.

हे पण वाचा : बंदी असूनही भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, राज्यातील २०० आमदार हे द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील. त्यामुळे उर्वरित १५ आमदार हे कोण? तसेच हे आमदार काँग्रेस पक्षाचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची आठ ते दहा मतं फुटल्याचं समोर आलं होतं. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना आठ ते दहा मतं कमी मिळाली होती. त्यामुळे त्यापैकी आठ ते दहा मते ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात पडतात का? हे पहावं लागेल. यासोबतच आणखी कुठले आमदार फुटतात हे पहावं लागेल.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, २०० आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील. त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा आधार घ्यावा लागणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तांत्रिकदृष्ट्या कुठलाही व्हिप लागू होत नाही. हे मतदान अतिशय गुप्त पद्धतीने होतं. त्यामुळे या मतदानाचा फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला होतो का हे पहावं लागेल. गुप्तमतदान असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी