Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या रॅलीमुळे शिंदे गट अस्वस्थ ? संपूर्ण राज्यात सर्वेक्षण करून जाणून घेणार जनमत

आगामी निवडणुकीत जनमत कुणाच्या बाजूला आहे हे तपासण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सर्वेक्षण घेणार आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची ही कल्पना असल्याचे सांगितले जात आहे. 

eknath shinde and aditya thackeray
आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आगामी निवडणुकीत जनमत कुणाच्या बाजूला आहे हे तपासण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सर्वेक्षण घेणार आहे.
  • त्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही देण्यात आले आहे.
  • एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची ही कल्पना असल्याचे सांगितले जात आहे. 

knath Shinde : मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असे असले तरी आगामी निवडणुकीत जनमत कुणाच्या बाजूला आहे हे तपासण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सर्वेक्षण घेणार आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची ही कल्पना असल्याचे सांगितले जात आहे. (eknath shinde contract to private firm for survey in maharashtra before upcoming election)

Gulabrao Patil : संजय राऊत हे जनतेतून निवडून येण्याच्या लायकीचे नाहीत, गुलाबराव पाटील यांची जहरी टीका

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात रॅली काढण्यास सुरूवात केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभांना आणि रॅलींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जनतेच्या मनात काय आहे याची चाचपणी करण्यासाठी एकनाथ शिंदे गट राज्यात सर्वेक्षण करणार आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची ही कल्पना आहे. परंतु श्रीकांत शिंदे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

shocking News : शिंदे सरकारचा अजून एक धक्का; यावेळी शिवसेनेला नाहीतर जनतेला देणार 440 चा शॉक

जनमत चाचणी

बंडखोरीनंतर जनमत आपल्या विरोधात तर नाही ना याची चाचणी शिंदे गट करत आहे. जर जनमत शिंदे गटाच्या विरोधत असेल तर त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच शिंदे गट हे सर्वेक्षण करून घेत आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर शिंदे गटाला पुढील रणनीती ठरवणे सोपे जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. खरी शिवसेना आपलीच आहे असा दावा शिंदे गटाने केला आहे, शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही शिंदे गटाने आपला हक्क सांगितला आहे, इतकेच नाही तर शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्राच्या जनतेचा काय मूड आहे हे शिंदे गटाला जाणून घ्यायचे आहे. आगामी निवडणुकीत जनता आपल्याला नाकारणार तर नाही ना अशी शिंदे गटातील आमदारांना भिती आहे.  

पकडले जाऊ नये म्हणून १३ कोटींचे कोकेन गिळणाऱ्याला मुंबईत अटक


श्रीकांत शिंदे यांची कल्पना

राज्यात जनमताची चाचणी घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्यण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. यासाठी त्यांनी कर्नाटकातील पब्लिक पॉलीसी रिसर्च इन्स्टिट्युट आणि दिल्लीतील निवडणूक संशोधन संस्थांच्या काही व्यक्तींची भेट घेतली आहे. असे असले तरी खासदार शिंदे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. आगामी निवडणूक समोर ठेवून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतरच शिंदे गट स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी