मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली. उद्धव ठाकरे यांच्याकडून संतोष बांगर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर बांगर यांनी आज मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन केलं. हिंगोलीतील समर्थकांसह आमदार संतोष बांगर हे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर दाखल झाले आणि त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सुद्धा तेथे आले आणि त्यानंतर त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांच्या समर्थकांना संबोधित करताना म्हटलं, आम्ही शिवसेनेतच आहोत. हे बंड नाहीये तर अन्याया विरोधातील उठाव आहे. 40-50 लोक जे आज एका भूमिकेच्या सोबत आले आहेत ही भूमिका हिंदुत्वाची आहे. राज्याला पुढे नेणारी ही भूमिका आहे. संतोष बांगर हेच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख आहेत. जिल्हा प्रमुखाची जबाबदारी यापुढे तुझ्यावर सोपवतो.
हे पण वाचा : "काम असेल तर फोन लावायला सांगतो, कॅमेरा सुरू करायला नाही" मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हिडिओवरुन अजितदादांचा टोला
एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हणाले, इतकी मोठी ताकद संतोष बांगर यांच्या पाठीमागे आहे मग त्यांच्याजागी इतर कोण काम करू शकतो? आपल्याला सर्व सामान्यांना सहकार्य करायची आहे, मदत करायची आहे. संकट काळात आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की, सर्वसामान्य शिवसैनिक राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसला पाहिजे. तसा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला त्यात कोणाला दु:ख वाटण्याचं कारण काय? आनंद वाटला पाहिजे होता.
संतोष बांगर यांनी कोविड काळात स्वत:च्या खिशात हात घालून गोरगरिबांना मदत केली. स्वत:ची बँकेतील एफडी मोडली आणि सर्वसामान्यांना मदत केली. गेल्या अडीच वर्षांत शिवसैनिकांना जे भोगावं लागलं ते आपल्याला माहिती आहे. शिवसेनेला संपवण्याचं काम करण्यात आलं. अडीच वर्षे गेली तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. पण आता मी मुख्यमंत्री आहे. पुढील अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागणार नाही. शिवसैनिकाच्या वाटेला कुणी आलं तर आपण सोडत पण नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.