Uddhav Thackeray Interview : शिंदे गटाला, एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याचा पर्याय; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांना आता एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याचा पर्याय आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Uddhav Thackeray Interview
उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले.
  • एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • एकनाथ शिंदे यांना आता एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याचा पर्याय आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Uddhav Thackeray Interview : मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची (Deputy Cm)शपथ (oath)घेतली. एकनाथ शिंदे यांना आता एमआयएम (AIMIM) किंवा समाजवादी पक्षात (Samajwadi Party) विलीन होण्याचा पर्याय आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला लगावला आहे. 

अधिक वाचा : Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कायदेतज्ञ आणि घटनातज्ञांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी २/३ बहुमत असलेल्या गटाला वेगळी मान्यता मिळत होती. परंतु आता हे शक्य नाही कारण त्यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. या गटाला आता एका पक्षात विलीन होण्याचा एकमेव मार्ग आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षांचा त्यांना पर्याय आहे.  परंतु हा गट जर भाजपमध्ये विलीन झाला तर त्यांचा उपयोग संपेल. शिंदे आणि फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होती तेव्हा फडणवीसांनी शिंदेंचा माईक खेचला. आमचे तीन पक्षांचे सरकार होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यांनी कधीच माझ्यासमोरील माईक खेचला नव्हता. कारण आमच्यात एक संमजसपणा होता असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

मनसेला अनुल्लेखाने मारले

या संपूर्ण मुलाखातीत उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नावही घेतले नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. तसेच एकनाथ शिंदे गटानेही मनसेसोबत संपर्क साधला होता. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. तेव्हा शिंदे गटाच्या विलीनीकरणावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. तसेच असे करताना माझ्या मनसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही असे राज ठाकरे म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मनसेचा उल्लेखही न करता शिंदे गटाला एमआयएम किंवा सपासारख्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय आहे असा टोला लगावला.

Sanjay Raut : ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका​

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी