"यापुढे पत्रकार परिषदेत राणेंचं नाव घेणार नाही", दीपक केसरकरांनी असं का म्हटलं? वाचा

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 06, 2022 | 18:53 IST

Deepak Kesarkar on Narayan Rane: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Eknath Shinde group spoksperson Deepak kesarkar said I will never use rane name in my pc what happned exactly read in marathi
"यापुढे पत्रकार परिषदेत राणेंचं नाव घेणार नाही", दीपक केसरकरांनी असं का म्हटलं? वाचा 
थोडं पण कामाचं
  • ठाकरे कुटुंबीयांची बदनामी होणं अयोग्यच - दीपक केसरकर
  • शिवसेनेतील फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही - दीपक केसरकर
  • माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ राणेंशी जोडणं चुकीचं - दीपक केसरकर

Deepak Kesarkar: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्या बदनामीमागे राणे कुटुंबीय असल्याचं म्हटलं. दीपक केसरकर यांनी थेट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज दीपक केसरकर यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत मोठं विधान केलं आहे. (Eknath Shinde group spokesperson Deepak kesarkar said I will never use rane name in my pc what happened exactly read in marathi)

यापुढे राणेंचं नाव पत्रकार परिषदेत घेणार नाही

दीपक केसरकर म्हणाले, माझा आणि राणे साहेबांचा वाद झाला होता हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचा रेफरन्स त्याच्याशी जोडणे हे चुकीचं आहे. जेव्हा-जेव्हा राणे साहेब मला भेटले आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत मी अत्यंत आदरपणे वागलेलो आहे. अनेकदा मी सांगितलं आहे, राणे साहेबांसोबत माझा व्यक्तिगत वाद नाहीये. जिल्ह्याच्या विकासात त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ आली तर मी नेहमीच तयार आहे हे मी वारंवार सांगितलं आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं की, पवार साहेबांच्या विरोधात मी कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं असल्याने माझ्या एकंदरीत वक्तव्यात मी कधीही पवारसाहेबांचं नाव घेणं टाळलं आहे. मी एनसीपी म्हणतो पवार साहेबांचं नाव नाही घेत. तसंच माझ्या लक्षात आलं आहे, मी किती चांगलो बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो तर त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्यासोबत झालेल्या वादासोबत जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात ज्या-ज्यावेळी माझ्या पत्रकार परिषद होतील त्यावेळी राणेंचं नाव घेतलं जाणार नाही.

अधिक वाचा : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख करत मानले मतदारांचे आभार

शिंदेंनी युती केल्याने आक्षेप का?

दीपक केसरकर म्हणाले, तुम्ही जर युती करणार होते आणि ती केली नाही त्याऐवजी शिंदे साहेबांनी केली तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे?. शेवटी युती तुम्हालाही भाजपसोबत करायची होती आणि शिंदे साहेबांनी सुद्धा भाजपसोबतच युती केली आहे. ही वस्तूस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ज्या काही यात्रा सुरू आहेत त्यातून लोकांना भडकवलं जात आहे. आमच्या आमदारांबाबत विशेषणं आमच्या आमदारांबाबत म्हटली जात आहेत. हे बोलण्याचा कुणाला नैतिक अधिकार आहे का? स्वत: आदित्य ठाकरे साहेब सुद्धा याचं उत्तर देऊ शकले नाहीत.

अधिक वाचा : भारतात शरिया कायदा नाही, हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ : नितेश राणे

महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरे हवीत

दीपक केसरकर पुढे म्हणाले, वस्तूस्थिती काय आहे की, तुम्ही भाजपसोबत निवडणुकीपूर्वी युती केली होती. काही कारणास्तव ही युती तुटलेली असली तर पुन्हा ती युती करण्याचं तुमचं निश्चित होतं तर मग इतरांना नावे का ठेवली जात आहेत. त्यांना विश्वासघातकी का म्हटलं जात आहे, गद्दार का म्हटलं जात आहे याची उत्तरे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला दिली पाहिजेत. मला देण्याची गरज नाहीये. तुम्ही ती उत्तरे देऊ शकले नाहीत म्हणून कालचा एक दिवस मी थांबलेलो होतो. आज मी सांगतो.... माझा आणि राणे साहेबांचा जो वाद होता हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ती एकदा लढाई संपल्यावर पुन्हा माझा कुठलाही वाद झाला नाही. त्यांचा जो रेफरन्स आलेला होता तो त्यांच्या एका पत्रकार परिषद झाली होती त्या संदर्भात होता.

अधिक वाचा : माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ

तुम्ही केलं तर ते चांगलं आणि आम्ही केलं तर...

दीपक केसरकर पुढे म्हणाले, मी टीव्हीवर हेडलाईन्स पाहत होतो तेव्हा असं दिसलं की, मोदींकडे राणेंच्या बाबत तक्रार केली असं वाचलं. मी मोदीसाहेबांकडे राणेंबाबत कधीही तक्रार केलेली नाहीये. कारण, व्यक्तीगत तक्रारी कोण ऐकून घेत नसतो. प्रश्न हा सिद्धांतांचा, तत्वांचा असतो. ज्या प्रमाणे ठाकरे कुटुंबीयांची बदनामी होणं योग्य आहे की अयोग्य असं विचारलं तर राज्यातील कुणीही म्हणेल की अयोग्य आहे. मग अयोग्य असेल तर ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणे यामध्ये चुकीचं काहीही नाहीये. यानंतर तुमच्या स्वत:च्या बैठका झाल्या. त्या जरी खाजगी बाब असल्या तरी त्यात जे ठरलं होतं जे राहुल शेवाळे यांनी सांगितलं होतं, मी स्वत: त्याला साक्षीदार आहे की, शिवसेना आणि भाजप एकत्र येणार होते. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे ते एकत्र येण्याला काहीही चुकीचं नव्हतं हे माझं म्हणणं आहे. पण तुम्ही केलं तर ते चांगलं आणि आम्ही केलं तर वाईट ही भूमिका चुकीची आहे.

त्यामुळे अशा पद्धतीने जी शिवसेना बाळासाहेबांनी बांधली, जी मराठी माणसाच्या हितासाठी संघटना तयार झाली त्यात आज फूट पडत आहे. ही फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. म्हणून जी भूमिका तुम्ही घेतली होती त्या अनुषंगाने शिंदे साहेबांना किंवा आमच्या कुठल्याही आमदारांवर आरोप करता कामा नये असंही दीपक केसरकर म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी