एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, विधीमंडळ सचिवालयाचे पत्र

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 04, 2022 | 06:54 IST

Eknath Shinde Is The Group Leader Of Shiv Sena Legislative Secretariat Letter To Shinde And Bharat Gogawale : विधीमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद असल्याचा निर्वाळा देणारे पत्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना दिले. 

Eknath Shinde Is The Group Leader Of Shiv Sena Legislative
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, विधीमंडळ सचिवालयाचे पत्र  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, विधीमंडळ सचिवालयाचे पत्र
  • भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद, विधीमंडळ सचिवालयाचे पत्र
  • विधानसभेत शिवसेनेच्या सर्व म्हणजेच ५५ आमदारांवर प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेला पक्षादेश अर्थात व्हिप लागू होणार

Eknath Shinde Is The Group Leader Of Shiv Sena Legislative Secretariat Letter To Shinde And Bharat Gogawale : शिंदे सरकारने दिलेले उमेदवार आणि भाजपचे आमदार असलेले राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले. यानंतर विधीमंडळ सचिवालयाने शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेते आणि प्रतोद यांच्याशी संबंधित दाव्यांची समीक्षा केली. समीक्षेअंती विधीमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद असल्याचा निर्वाळा देणारे पत्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना दिले. 

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; एकनाथ शिंदेच गटनेते, तर भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्तीला विधीमंडळाची मान्यता

विधीमंडळ सचिवालय काय निर्णय घेणार याचा अंदाज राजकीय अभ्यासकांनी आधीच व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद असल्याचे विधीमंडळ सचिवालयाने पत्राद्वारे जाहीर केले आहे. तसेच विधीमंडळ सचिवालयाने आधीचे शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द केली आहे. विधीमंडळ सचिवालयाच्या या निर्णयामुळे शिवसेनेसमोर आता कोर्टात कायदेशीर लढाई लढणे हाच पर्याय आहे. 

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतच्या प्रस्तावावर ११ जुलै २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी विधीमंडळ सचिवालयाच्या ३ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. यानंतर कोर्ट पुढे काय करते यावर शिवसेनेच्या कायदेशीर लढाईचे पुढचे पाऊल निश्चित होणार आहे.

विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव

विधानसभेत आज (सोमवार ४ जुलै २०२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वासदर्शक ठराव सादर करतील. या ठरावावर मतदान घेतले जाईल. बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्यास शिंदे सरकारकडे बहुमत असल्याचे आणि सभागृहाचा सरकारवर विश्वास असल्याचे सिद्ध होईल.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार काय करणार?

उद्धव ठाकरे यांच्या गटात आदित्य ठाकरे यांच्यासह विधानसभेतील १५ ते १६ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. या आमदारांना विधानसभेत प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेला पक्षादेश अर्थात व्हिप लागू होणार आहे. या व्हिपचे पालन केले नाही तर संबंधित आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे प्रतोद भरत गोगावले करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी