eknath shinde rebel for bjp : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले खरे. मात्र या बंडानंतर जर भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर शिंदेंचे हे बंड भाजपाच्याच हिंदुत्वासाठी होते? असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात खरा हिंदुत्ववादी कोण यावरून भाजपा-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी सध्या तरी भाजपाच्या हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला असल्याचे चित्र आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत..बाळासाहेबांनी आम्हांला हिंदुत्वाची शिकवण दिली असल्याचे एकनाथ शिंदे सांगत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आम्ही हिंदुत्व कधी सोडले नसून विधानभवनात हिंदुत्वासाठी बोलणारा एकमेव मुख्यमंत्री असल्याचे सांगितले.
या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा अंतिम परिणाम काय होणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही जण आतापासूनच हे बंड भाजपासाठी असल्याचे आरोप करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.