एकनाथ शिंदेंचे बंड हीच आनंद दिघेंना गुरुदक्षिणा?

मुंबई
उमेर सय्यद
Updated Jun 23, 2022 | 12:11 IST

Eknath Shinde rebell is Gurudakshina to Anand Dighe? : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाले. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाली आहे.

Eknath Shinde rebell is Gurudakshina to Anand Dighe
एकनाथ शिंदेंचे बंड हीच आनंद दिघेंना गुरुदक्षिणा?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदेंचे बंड हीच आनंद दिघेंना गुरुदक्षिणा?
  • विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी
  • उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी

Eknath Shinde rebell is Gurudakshina to Anand Dighe? : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाले. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाली आहे. पहिल्यांदाच खरी शिवसेना कोणती असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी म्हणजे आनंद दिघे यांना दिलेली दक्षिणा आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. याचं कारणं म्हणजे १३ मे रोजी आनंद दिघे यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटानंतर एकनाथ शिंदेंनी अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं ट्वीट केलं आहे. 

सिनेमात सत्तेसाठी झुकणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेले आनंद दिघे दाखवले आहेत. पण सध्या सत्ता समीकरण साधण्यात गुंतलेले एकनाथ शिंदे दररोज बातम्यांमधून दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड हे नेमक्या कोणासोबतच्या निष्ठेसाठी आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी