संजय राऊत यांची ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावली, चेंडू पुन्हा टोलावला उद्धव ठाकरेंच्या कोर्टात 

मविआ सरकारमधून अगोदर बाहेर पडा आणि त्यानंतर आम्ही मुंबईत येऊ असे म्हणते शिंदे गटाने पुन्हा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे

Eknath Shinde rejects Sanjay Raut's offer, throws the ball again in Uddhav Thackeray's court
संजय राऊत यांची ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावली, 
थोडं पण कामाचं
  • मविआ सरकारमधून अगोदर बाहेर पडा आणि त्यानंतर आम्ही मुंबईत येऊ असे म्हणते शिंदे गटाने पुन्हा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे
  • एकनाथ शिंदे गटाने राऊतांची ऑफर धुडकावली
  • आम्ही मविआमधून बाहेर पडायला तयार आहोत, असे राऊत म्हणाले

मुंबई :  मविआ सरकारमधून अगोदर बाहेर पडा आणि त्यानंतर आम्ही मुंबईत येऊ असे म्हणते शिंदे गटाने पुन्हा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. (Eknath Shinde rejects Sanjay Raut's offer, throws the ball again in Uddhav Thackeray's court)

आम्ही मविआमधून बाहेर पडायला तयार आहोत,  २४ तासांच्या आत मुंबईत येऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावे अशी मोठी ऑफर खासदार संजय राऊत यांनी  बंडखोर आमदारांना दिली आहे.  त्यावर आता शिंदे गटाकडून ही ऑफर धुडकावली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, आता केवळ आश्वासनांनी काही होणार नाही असे म्हणत चेंडू पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संशय 

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेने हे नाटक केले असल्याचा संशय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार गेले की पाठवले असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राऊत यांनी दिलेली ऑफर त्याचाच एक भाग आहे का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी