"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 05, 2022 | 19:00 IST

Maharashtra CM Eknath Shinde on Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Eknath Shinde replied Uddhav Thacekeray saying speed of mercedes faded before speed of auto rickshaw because this is government of common man
"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं आता थेट उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत 39 आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार कोसळलं 
  • एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध करताना शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटाला समर्थन दिलं

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टिप्पणी केली. शिवसेना भवनात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरुन एक टिप्पणी केली. त्याच टिप्पणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं (Maharashtra CM Eknath Shinde replied to Shiv Sena party President Uddhav Thackeray) आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात महिला पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता म्हटलं, काल विधानसभेत रिक्षा सुसाट सुटली होता आणि त्याला ब्रेक लागतो की नाही... की कुठे अपघात होतो असं वाटत होतं. एकनाथ शिंदे यांचा प्रवास रिक्षा चालवण्यापासून सुरू झाला होता आणि त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरुन टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टिप्पणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला... कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!".

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. बंडखोरी करताना शिवसेनेच्या आणि अपक्ष आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत होता. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत आलं आणि अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यावर आता एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी