Maharashtra Politics: आदित्य ठाकरे अन् राऊतांसोबत झालेल्या 'त्या' वादामुळे एकनाथ शिंदेंनी घडवला भूकंप

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 22, 2022 | 12:29 IST

शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३५ ते ४० आमदार आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे आपण शिवसेनेत असल्याचं सांगत असताना शिंदे उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराज आहेत. आपण कोणताची निर्णय घेतला नव्हता तरी आपल्याला गटनेते पदावरुन हटवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 Environment Minister and Raut are responsible for Shinde's revolt
शिंदेंच्या बंडाला पर्यावरण मंत्री अन् राऊत आहेत कारणीभूत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडी सरकार संकटात
  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३५ ते ४० आमदार
  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईः शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३५ ते ४० आमदार आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे आपण शिवसेनेत असल्याचं सांगत असताना शिंदे उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराज आहेत. आपण कोणताची निर्णय घेतला नव्हता तरी आपल्याला गटनेते पदावरुन हटवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेच्या या बंडाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी असताना शिवसेने नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री व उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवेश देण्यात आला नव्हता. 

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना पवईतील हॉटेल रेनिसन्समध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथं आमदारांनी मतदानाविषयी माहिती देत असतानाच एकनाथ शिंदे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले होते, असं सांगण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी शिवसेनेने आमदारांना मतदानाच्या कोट्याबाबत माहिती देण्यात येत होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला अतिरिक्त मते देण्याला विरोध केला होता. त्यावरुनच हा वाद झाला असं सुत्रांनी म्हटलं आहे. काँग्रेसने विधानपरिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उभे केले होते. मात्र, भाई जगपात यांचा विजय झाला असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीच्या दोन दिवसांआधी रेनिसन्स हॉटेलमध्ये विधानपरिषद निवडणुकीत मतांचा कोटा ठरवून देण्यात आला होता. तसंच, मतदान कसं होईल यावर चर्चा सुरू होती. दरम्यान, याचवेळी शिंदे यांचे राऊत आणि आदित्य यांच्यासोबत मतभेद झाले. सेनेच्या आमदारांच्या मतांचा वापर करून काँग्रेसच्या उमेदवारांना आमदार म्हणून निवडून आणण्याची कल्पना शिंदे यांना पटली नाही. त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये वादाची ठिणगी पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या आधी घडलेला या प्रसंगामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी