Maharashtra Politics : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राष्ट्रीय पातळीत आज स्फोट घडवणार? मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची घेणार भेट

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 19, 2022 | 07:33 IST

एकनाथ शिंदेंनी (knath shinde) आमदारांच्या मदतीने राज्यातील सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर विराजमान झाले. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आता शिवसेना (Shiv Sena )पक्षावर दावा ठोकणार असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पायाखालून जमीन आणि हातातून पक्षही निसटताना दिसत आहे.

Eknath Shinde will meet  pm with shivsena Mps
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राष्ट्रीय पातळीत आज स्फोट घडवणार?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक
  • एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांचा आकडा वाढला असल्याचं सांगितलं
  • विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी (knath shinde) आमदारांच्या मदतीने राज्यातील सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर विराजमान झाले. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आता शिवसेना (Shiv Sena )पक्षावर दावा ठोकणार असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पायाखालून जमीन आणि हातातून पक्षही निसटताना दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्षाची नवीन कार्यकारणी स्थापित केली आहे. त्यात आज मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून आज शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांसह एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.   

खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.

'मूळ शिवसेना आमचीच"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांना घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतील. परंतु एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांचा आकडा वाढला असल्याचं सांगितलं. फक्त 12 खासदार नाही तर 18 खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. जर शिंदेंनी दावा केल्याप्रमाणे खासदारांची संख्या तितकी असेल तर उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसू शकते. तत्पु्र्वी शिंदे गटाने नवीन कार्यकारणी स्थापित केली असून लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार आहेत. तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती समजत आहे. 

Read Also : शनिदोषापासून मुक्त होण्यासाठी श्रावण शनिवार आहे महत्त्वाचा

याविषयीचे लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप देऊ शकतात, असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत. 

शिवसेनेचे 18 खासदार शिंदे गटात 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक काल ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. आज माध्यामांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दावा केला की, 18 खासदार आमच्या गटात सामील आहेत. 

Read Also : पीएफ खातेधारकांना मिळणार अधिक रक्कम! ईपीएफओचा मोठा निर्णय

लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार

विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी