मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना हे नाव तसेच निवडणूक पक्षचिन्ह (party sign)धनुष्यबाण (bow and arrow) हे चिन्ह शिंदे गटाला दिले. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray group) पक्ष चिन्ह आणि पक्ष नावावरुन वाद सुरू होता. यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. पंरतु या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असले तरी चोर हा चोरच असतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देताना एक खोचक सल्ला दिला आहे. (Eknath Shinde's advice to Uddhav Thackeray after the result )
अधिक वाचा : महाशिवरात्री कधी कराल रुद्राभिषेक जाणून घ्या शुभ मुहूर्त
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि नाव दिले असले तरी खरे आमच्याकडेच खरे धनुष्यबाण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला शिंदेंनी दिला आहे.
अधिक वाचा : चेतन शर्मांनी BCCI कडे सोपवला राजीनामा
उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांवर अशा प्रकारचा आरोप केला जात नाही. यापुढेतरी तुमच्यात सुधारणा घडू द्या.
अधिक वाचा : INDvAUS:रविंद्र जडेजाचा फलंदाजीसह गोलंदाजीतही विक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला नाव आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, शिंदे गटाला मिंधे गट म्हणत त्यांच्यावर संतप्त टीका केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला.
पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, “कोणीतरी आम्हाला चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार आमदार चोर १३ खासदार चोर, शेकड-हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवत आहात. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.