बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडणार नाही, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'?, नव्या इनिंगचे संकेत

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 22, 2022 | 08:15 IST

राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सकाळी शिंदेंचा गट गुवाहाटीला पोहचला आहे.

Eknath Shinde's 'Jai Maharashtra' to Shiv Sena?
एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले
  • एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले.

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सकाळी शिंदेंचा गट गुवाहाटीला पोहचला आहे. अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याची चर्चा होत आहे. परंतु माध्यमांशी बोलताना आपण अद्याप शिवसेना सोडली नाही, असा प्रकारचे विधान शिंदे करत आहेत. 

दरम्यान, ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.

एकनाथ शिंदे आपल्यासह ४० आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये, यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्टकरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.

सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी